पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील रामटेकडी भागात येथे खुलेआम गुटखा विक्री सुरू! अवैध व्यवसायांना मिळतेय अभय…
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने दहा वर्षांपूर्वी लागू केला आहे. रामटेकडी परीसरातील गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. बंदी लागू झाली तेव्हा छुप्या मार्गाने होणारी गुटखा विक्री आता तर खुलेआम होत आहे. रामटेकडी चौकांमधील हॉटेल बाहेरील पान टपऱ्यांचा धंदा तेजीत आला असून, पोलीसांच्या खाकीचा धाक राहिला नसल्याची वास्तव चित्र येथे खुलआम पाहण्यास मिळत आहे. गुलफाम नामक व्यक्ती व त्यासारखे असे कीतेक जण रामटेकडी येथे गुटखा विक्री मोट्या प्रमाणात करतात.
रामटेकडी परिसरातील बहुतांश पानटपरी आणि किराणा दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे.परराज्यातील नागरिकांची या व्यवसायातील संख्या लक्षणीय आहे. कायम गर्दी असल्यामुळे येथे गुटखा विक्रीची उलाढाल जास्त प्रमाणात होते. आधी गुटखा विक्री करणारे किरकोळ व्यावसायिक या धंद्यात तरबेज झाल्याने गब्बर झाले आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

