मॉर्निंग वॉक करणा-या इसमाचा गाडीवरुन येवून मोबाईल हिसकावून पळून जाणा-या इराणी आरोपीस सीसीटिव्हि फुटेच्या माध्यमातुन पकडुन केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर,

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील सांगरीया सोसायटी, दोराबजी मॉलजवळ इसम नामे अविनाशसिंह शैलेद्रसिंह चौहान हे दि ११/०५/२०२४ रोजी सकाळी ०६/३०वा ते सकाळी ०६/४५ दरम्यान सकाळी राहते घरापासुन मॉर्निंग वॉक करित मोबाईल वरुन गाणी ऐकत असताना त्याच्या हातातील आयफोन मोबाईल फोन हा एका अनोळखी मोपेड दुचाकीवरील इसमाने हिसकावुन चोरी गेला होता. सदर बाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरनं५३३/२०२४ भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक मानसिग पाटील यांनी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, तपास पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा. २८३ अमोल हिरवे, पो. हवा.६९४६ राहुल वंजारी, पो.शि.९१२६ विकास मरगळे, पो. शि.८७५१ शशांक खाडे, पो.शि.५५५ अक्षय शेंडगे, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो. शि.८२०१ अभिजीत जाधव, पो.शि.१०११४ सुहास मोरे, पो.शि.१००२६ राहुल थोरात असे घटनास्थळाच्या आजुबाजुला असणा-या सीसीटिव्हिच्या माध्यमातुन शोध घेत असताना एकुण ७० ते ८० फुटेज चेक करुन नमुद गुन्हा हा आरोपी हादीहासन सर्फराज इराणी, वय २३ वर्षे, रा.न्यु बिल्डींग, भारत पेट्रोल पंप शेजारी, आंब्याच्या झाडाच्या जवळ हांडेवाडी रोड, हडपसर पुणे यांनी केला असल्याचे पो.शि.५५५ अक्षय शेंडगे, पो. शि.९१२६ विकास मरगळे, पो.शि.८७५१ शशांक खाडे, यांनी सीसीटिव्हिच्या माध्यमातुन माग काढुन उघड केले.

Advertisement

सदर आरोपी यांच्या ठावठिकाण्याबाबत व तो नेहमी वावरत असणा-या ठिकाण्याबाबत माहिती घेत होतो. सदर आरोपी हा सायंकाळच्या सुमारास हांडेवाडी चौकात चहा पिण्यासाठी व मित्राणा भेटण्यासाठी येत असतो अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने आज दि.२२/०५/२०२४रोजी वरिल स्टाफच्या मदतीने हांडेवाडी चौकात सापळा रचुन थांबलो असताना नमुद आरोपी हा रात्रौ २०.०० वा सुमारास पांढ-या, ग्रे, पिवळया रंगाचा लायनिंग शर्ट घालुन आलेला दिसला. त्याबाबत बातमीदाराने अंगुली निर्देश करुन दाखविले असता त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेणेकामी गेलो असता त्याला आमचा सुगावा लागला असता तो पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा त्यास स्टाफच्या मदतीने पाठलाग करुन ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने हादीहासन सर्फराज इराणी, वय २३ वर्षे, रा. न्यु बिल्डींग, भारत पेट्रोल पंप शेजारी, आंब्याच्या झाडाच्या जवळ हांडेवाडी रोड, हडपसर पुणे असे सांगितले. तेव्हा त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत चोरी केलेला आयफोन मोबाईल फोन मिळुन आला आहे. सदर मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बालाजी डिगोळे हे करित आहे.

वरिलप्रमाणे कामगिरी मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त,मा.मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा.आर राजा, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा.गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार पो.हवा.२८३ अमोल हिरवे, पो. हवा.६९४६ राहुल वंजारी, पो.शि.९१२६ विकास मरगळे, पो.शि.८७५१ श‍ खाडे, पो.शि.५५५ अक्षय शेंडगे, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो.शि.८२०१ अभिजीत जज
पो.शि.१०११४ सुहास मोरे, पो.शि.१००२६ राहुल थोरात यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!