गुन्हे शाखा युनिट-६ ची धडाकेबाज कारवाई ! स्वतःच्या मुलीची निघृण हत्या करणाऱ्या नराधम बापास अवघ्या ०३ तासात केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि.०३/०१/२०२४ रोजी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या पाठीमागे इसम नामे फकीरा गुंडा दुपारगुडे यांने त्याचीच १० वी मध्ये शिकत असणारी मुलगी अक्षदा दुपारगुडे हिचा स्वतःचे राहते घरात धारदार शस्त्राने सपासप वार करुन निधुण खून करुन आरोपी पळून गेला. सदरबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ०८/२०२४ भा.दं.वि.कलम ३०२ आर्म अॅक्ट ४(२७) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास युनिट ६ कडील अधिकारी व अमंलदार करत असता, आरोपी नामे फकीरा गुंडा दुपारगुडे हा गाडीतळ, हडपसर पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती बातमीदारा मार्फत मिळाली. सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठांचे सूचनेप्रमाणे तात्काळ युनिट-६ कडील अधीकारी व अंमलदार असे हडपसर भागात पुणे सोलापुर रोडवर जावुन बातमीतील वर्णनाच्या इसमासाचा शोध घेत असताना गाडीतळ परिसरात एक इसम संशयितरित्या हलचाली असताना घाई गडबडीत सोलापुरकडे बसमधुन जाण्याच्या तयारीत दिसला. सदर इसमास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला असता त्यास पथकातील अधीकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन शिताफिने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव फकीरा गुंडा दुपारगुडे वय-४५ वर्षे धंदा मजुरी रा- वाघोली सरकारी हॉस्पीटल जवळ, संदीप सातव यांचे खोलीत नगर रोड जवळ वाघोली पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता घरामध्ये त्याची व त्याची पत्नी व मुलगा तसेच मयत मुलगी यांचेत मी काहीही काम करत नाही व काहीही पैसे कमवत नाही दारु पितो यावरुन वाद-विवाद होत होते. त्यामुळे सततच्या भांडणाला कंटाळुन मी आज दि.०३/०१/२०२४ रोजी सकाळी माझा मुलगा व पत्नी घरात नसताना माझी मुलगी अक्षदा हीचे सोबत दारु पिणेचे कारणावरुन वाद झाल्यामुळे घरात असलेल्या उस तोडण्याच्या धारदार कोयत्याने सपासप वार करुन तिला जिवे ठार मारल्याचे सांगीतल्याने त्यास लागलिच ताब्यात घेवुन गुन्हयाचे पुढील कार्यवाही कामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले,
सदरची कामगिरी मा.श्री. रितेशकुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रामनाथ पोकळे, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, मा. श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे -२, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ वे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब राकटे, नितीन मुंडे, प्रतिक लाहीगुडे, राचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन घाडगे व ज्योती काळे यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

