कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकाश्प्द कामगिरी ! तरुणाच्या खूनाचा प्रयत्न करणारा शूटरला केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मोटरसायकलचा धक्का लागल्याने झालेल्या वादात तरुणाच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न करुन पळून गेलेल्या सोहेल शूटर याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेत अरबाज खलील शेख (वय २४, रा. नेहरु पार्क, कोंढवा खुर्द) हा तरुण जबर जखमी झाला असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. ही घटना कोंढव्यातील नावजीश चौकात २१ जुलै रोजी रात्री आठ वाजता घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एन पी केबल वानवडी या कंपनीमध्ये काम करतात. त्यांना सुट्टी असल्याने २१ जुलै रोजी रात्री ते हयात हॉटेलसमोर आले होते. तेथे त्यांचे नातेवाई बशीर खान, त्याचे चाचा गुलाब, चाची रेश्मा पठाण हे आले होते. चाचा व चाची यांना रिक्षात बसवून देत असताना तिघेजण मोटारसायकलवरुन आले. त्यांचा चाचीला धक्का लागला.
तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना गाडी नीट चालवता येत नाही का असे विचारले. त्यावर ते गाडी पार्क करुन फिर्यादीकडे आले. फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. तेव्हा सोहेल शूटर याने त्याच्याकडील कोयता बाहेर काढला. ते पाहून फिर्यादी पळून जाऊ लागले. तिघांनी त्यांचा पाठलाग करुन जलधारा बिल्डिगच्या गेटवर त्यांना पकडले. सोहेल शूटर याने कोयत्याने त्यांच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तिघे पळून गेले.
कोंढवा पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सोहेल शूटर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अन्य दोघांचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

