शेवाळवाडी मांजरी येथे झालेल्या खुनाच्या गुन्हयातील आरोपीस हडपसर तपासपथका कडून अटक “
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
संपादक :- पंकेश जाधव 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २५/०५/२०२४ रोजी रात्रौ २०/३० वाजताचे सुमारास उमेश जगताप यांचे मालकिचे बांधकाम सुरु असलेल्या खोलीमध्ये मांजरी फार्म शेवाळवाडी मांजरी पुणे याठिकाणी फिर्यादी श्री भास्कर तुकाराम आडसुळ वय ६४ वर्षे, रा शिवचैतन्य कॉलनी लेन नं ५ शेवाळवाडी मांजरी हडपसर पुणे यांचा मुलगा संतोष भास्कर आडसुळ वय ४१ वर्षे, रा सदर व आरोपी राहुल दत्तात्रय घुले हे दोघे एकत्र दारु पित असताना एक महिन्यापूर्वी त्यांचेमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन आरोपी राहुल घुले याने मयत संतोष आडसुळ यास हाताने मारुन उचलुन जमीनीवर आपटुन त्यास जीवे ठार मारलेबाबत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८५७/२०२४ भा द वि कलम ३०२ प्रमाणे दि २६/०५/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचे नियोजन केले. व घटनास्थळाचे आजुबाजुस अशा भागात फिरून माहीती घेत असताना, मयत इसम संतोष आडसुळ यास राहुल घुले याने दारु पित असताना हाताने मारुन त्यास जमीनीवर आपटले व त्यामध्येच त्याचे डोक्यास इतर शरिरावर मार लागल्याने तो मयत झाल्याचे तेथील उपस्थित असणाया प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितले. पाहिजे आरोपी राहुल घुले याचा तांत्रिक मदतीच्या सहाय्याने तसेच गुप्त माहितीदाराच्या मदतीने हडपसर भागात शोध घेवुन राहुल दत्तात्रय घुले वय ४१ वर्षे, रा. मांजरी फार्म शेवाळवाडी काळुबाई मंदिराच्या जवळ, ता. हवेली जि. पुणे. यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की, जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मयत संतोष आडसुळ यास हाताने चापट मारुन त्यास जमीनीवर उचलून आपटून, त्यास जिये ठार मारले असल्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपीस दि.२६/०५/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे करित आहेत.
सदरची कामगिरी ही श्री अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर, श्री. प्रविण पवार, मा. पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ३ अति. कार्यभार परिमंडळ-०५, यांचे मागदर्शनाखाली मा. विठ्ठल दबडे साो. सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा-०१, पुणे शहर, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, मंगल मोढवे मॅडम, पोनि. (गुन्हे), उमेश गित्ते, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, जोतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरूध्द सोनवणे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

