शिवाजीनगर पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगीरी ! दुकान फोडुन चोरी केलेल्या आरोपींना केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे  :- दि.२०/०४/२०२४ जंगली महाराज रोड वरील दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन दुकानातील अंदाजे ७२,०००/- रु. कि.चे कपडे, इमिटेशन ज्वेलरी व डिव्हीआर मशीन चोरी करुन नेले होते. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ९९/२०२४ भादंवि. कलम ४५४,४५७,३८० अन्वये दाखल आहे.

Advertisement

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरातील अनेक सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासून आरोपीचे चोरी करुन जातानाचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले व सदर फुटेज वरुन एकुण तीन आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर सदर फुटेजचा व इतर अनेक सी.सी.टि.व्ही. फुटेजचा उपयोग करुन आरोपीचे नाव व पत्ता निष्पन्न केले. त्यानंतर सदरचे आरोपी हे चोरी करुन उत्तर प्रदेश येथे गेल्याचे समजले. आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सतत पाळत ठेवून आरोपी परत चिखली पुणे येथे येताच दिनांक ०६/०६/२०२४ रोजी आरोपी बालकेश रामसनेही शर्मा वय ३२ वर्ष रा. देवराई सोसायटी, जाधववाडी, चिखली, पुणे मुळगांव गोरखपुर उत्तरप्रदेश यास अटक करुन त्याच्या कडून गुन्हात चोरी गेलेले कपडे व इटिमेशन ज्वेलरी जप्त केली. तसेच दिनांक ०९/०६/२०२४ रोजी दुसरा आरोपी सन्नेलाल जोगेंद्र विश्वकर्मा वय २३ वर्ष रा. देवराई सोसायटी, जाधववाडी, चिखली, पुणे मुळगांव महाराजगंज, उत्तरप्रदेश यास अटक करुन त्याच्या कडून गुन्ह्यात चोरी गेलेला डि.व्हि.आर. जप्त केला. अशा प्रमाणे गुन्ह्यतील एकुण ७२,०००/- रु.कि.चा संपुर्ण मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकिस आणला आहे. सदर गुन्ह्यातील तिस-या पाहिजे आरोपीचा तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परि-०१ श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, श्री. साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोउपनि अजित बडे, सपोफौ. अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार बशिर सय्यद, रणजित फडतरे, अतुल साठे, राजकिरण पवार, सुदाम तायडे, प्रविण दडस  यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!