इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जचा पदग्रहण समारंभ संपन्न


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- दि. 23 जुलै मंगळवार रोजी 2024-25 साठी इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या अध्यक्ष पदाची सूत्रे सौ. शुभदा केळकर यांनी माजी अध्यक्ष सौ. सुविधा नाईक यांच्या कडून स्विकारली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डिस्ट्रिक्ट 313 च्या अध्यक्षा डॉ. शोभना पालेकर यांच्या उपस्थितीत मावळत्या अध्यक्षा सुविधा नाईक यांनी सौ. शुभदा केळकर यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. सुरवातीला माजी अध्यक्षांनी वर्षभर राबवलेल्या पुणे विंग्जच्या कार्याचा आढावा घेतला. मागील 2023 – 24 हे इनरव्हीलचे शतकी वर्ष होते, या वर्षात क्लबने केलेल्या अलौकिक कार्याबद्दल डिस्ट्रिक्ट 313 ने त्याची दखल घेऊन विविध पुरस्कारांनी आपल्या क्लबला पुरस्कारित केल्याचे माजी अध्यक्षांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. शोभनाजी पालेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Advertisement

तर नवीन अध्यक्षांनी या वर्षीच्या थीमनुसार व डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. शोभनाजी पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीयांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, ग्रिन मॅरेथॉन, महिलांची तपासणी – गर्भाशयाचा कर्करोग व लसीकरण , डोळ्यांचे ऑपरेशन व चष्मा वाटप, जेष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, तृतीय पंथियांसाठी विविध उपक्रम, मुलींची Hb तपासणी, मतिमंद शाळांसाठी मार्गदर्शन असे अनेक उपक्रम आम्ही राबविणार आहोत असे सांगितले.यावेळी जि प शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या, टिफिन बॉक्स, ग्रीन बोर्ड देण्यात आले. तसेच गरजू व्यक्तीला व्यवसायासाठी ईलेक्ट्रॉनिक वजनकाटाही देण्यात आला.

सूत्रसंचालन उज्ज्वला नवले यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ. अनिता बोनी यांनी मानले.

नविन कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे:-

प्रेसिडेंट :- शुभदा केळकर
आय.पी.पी :- सुविधा नाईक
सेक्रेटरी :- अनिता बोनी
ट्रेजरर :- सुनंदा डेरे
आय. एस.ओ :- डिम्पल शहा
एडिटर :- उज्ज्वला नवले
C C :- डॉक्टर मीना जगताप
व्हाईस प्रेसिडेंट :- ऋता वर्धे
जॉईंट सेक्रेटरी :- जयश्री तांबोळे
E.c :-मेंबर :- देवयानी देशमुख
E.C ,मेंबर :- अंजली देशपांडे


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!