गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनिय कामगिरी. तळेगाव दाभाडे येथे गोळीबार करणाऱ्या ०२ आरोपींना व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ०२ आरोपींना सांगवी परीसरातुन अवैध शस्त्रांसह घेतले ताब्यात.


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुंडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ३२०/२०२४ भा.द. वि. कलम ३०८,१४३,१४४,१४७, १४८,१४९, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) (२७), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(४) या गुन्हयातील आरोपी रोहन ऊर्फ चिकया उत्तम शिंदे २) निरज ऊर्फ दादया बाबू पवार व ३) आदित्य नितीन भोईनल्लू यांना यापुर्वी गुंडा विरोधी पथकानेच नाशिक येथुन ताब्यात घेतले होते, परंतु सदर गुन्हयातील टोळी प्रमुख आरोपी विकी खराडे याचा थांगपत्ता लागत नव्हता.
पाहीजे आरोपी विकी खराडे याचा वापरता मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषण केले असता सदरचा आरोपी हे मुरबाड, जि. ठाणे या ठिकाणी वास्तव्यास असले बाबत माहीती प्राप्त झाली, लागलीच गुंडा विरोधी पथकातील पो.उप निरी. अशोक जगताप व पथकाने सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता विकी खराडे हा रबाळे एम.आय.डी.सी. नवी मुंबई या ठिकाणी असल्याचे माहीती प्राप्त झाली. सदर ठिकाणी जावून स्थानिक पोलीसांचे मदतीने कसोशीने शोध घेवून दाखल गुन्हयातील टोळी प्रमुख पाहीजे आरोपी १) विवेक ऊर्फ विकी राजेश खराडे वय २० वर्षे, रा. हनुमान मंदीराजवळ, रामलींगरोड, कामाठीपुरा, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे व २) पांडुरंग ऊर्फ पांडा बालाजी कांबळे, वय २४ वर्षे, रा. मु. पो. रामलींग, तुकाईमळा, शिरुर, ता. शिरुर जि. पुणे यांना ताब्यात घेवून तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेच्या ताब्यात पुढील तपासकामी दिले असून आरोपींना मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सोो. वडगाव न्यायालय, ता. मावळ जि. पुणे यांचे न्यायालयात हजर करुन त्यांची तपासकामी दि.२९/०७/२०२४ रोजी पर्यंत ०५ दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली असून अटक आरोपींकडुन तपासामध्ये एकुण ०२ गावठी बंदुके व ०४ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

Advertisement

सदर आरोपी गुंडा विरोधी पथकाचे ताब्यात असताना त्यांचेकडे तपास करता मिळालेल्या माहीतीनुसार आणखी काही अवैध शस्त्रे परीसरात असलेबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली, त्या अनुषंघाने पो.उ.नि. हजरत पठाण यांचे पथक तयार करुन सांगवी परीसरात रवाना करण्यात आले.दुसरी कारवाई पो.उ.नि. हजरत पठाण यांचे पथकाने प्रियदर्शनीनगर ते ममतानगर रोडवर जुनी सांगवी, पुणे येथे होंडा अॅक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच.१२ आर.ई.८८३५ वरील इसम नामे १) रोहीत दुर्गेश धर्माधिकारी वय २२ वर्षे, रा. कान्हु शितोळेचाळ, प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी, पुणे व २) अनिकेत सतिश काजवे, वय २८ वर्षे, रा. प्रियदर्शनीनगर, शेवटचा बसस्टाप, जुनी सांगवी, पुणे यांना ताब्यात घेवून त्याचेकडुन १,४४,०००/- रु. चे ०२ गावठी पिस्तुल, ०८ जिवंत काडतुसे व मोपेड हस्तगत करुन त्याचे

विरोधात सांगवी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ३०७/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३.२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपींस मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सोा. पिंपरी यांचे न्यायालयात हजर करुन त्यांची दि.२६/०६/२०२४ रोजी पर्यंत ०३ दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे.
तिसरी कारवाई :- सदर कारवाईमध्ये चाकण पोलीस ठाणे, गुन्हा नोंद क्र.८२७/२०१९, भा.द.वि. कलम ३०२,१२० (ब), ३४ या गुन्हयातील सुमारे ०५ वर्षापासुन पाहीजे आरोपी नामे तुषार ऊर्फ गोल्या रामराव राठोड वय २६ वर्षे, रा. घर नं. २९४७, तापकिरनगर, गजानन महाराज मंदिराजवळ, आळंदी देवाची, आळंदी, पुणे याचा वापरता मोबाईल नंबरचे केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन सदरचा आरोपी हा एच.पी. चौकाजवळ, महाळुंगे एम.आय.डी.सी., चाकण, जि. पुणे या परीसरात असल्या बाबत माहीती मिळाली, सदर ठिकाणी शोध घेऊन साईआंगण लॉज महाळुंगे एम.आय.डी.सी., चाकण पुणे येथुन ताब्यात घेवून चाकण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सोो. खेड न्यायालय, जि. पुणे यांचे न्यायालयात हजर करुन त्यांची तपासकामी दि.२६/०६/२०२४ रोजी पर्यंत ०२ दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सोो, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. वसंत परदेशी सोा., पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप, हजरत पठाण, पोलीस अंमलदार : प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहीते, तौसिफ शेख व TAW कडील नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!