खडक पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ! रेकॉर्डवरील आरोपीने व्यापा-याच्या दुचाकीच्या डिक्कीमधून चोरून नेलेले ३,००,०००/- रुपये आरोपीकडून हस्तगत करून आरोपीला केले जेरबंद.
पंकेश जाधव संपादक 7020794626
खडक पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत गुन्हयांना प्रतिबंधक घालण्याचे दृष्टीकोनातुन श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी सर्व पोलीस ठाणेना गुन्हे प्रतिबंधक व दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत, दिनांक १८/०८/२०२४ रोजी तक्ररीदार नामे श्री. निखील संजय नाईक, वय २७ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. नाईकवाडा १२२५/आय आपटे रोड शिवाजीनगर पुणे, यांनी खडक पोलीस ठाणे येथे येवून तक्रार दिली की, दिनांक १२/०८/२०२४ रोजी सायंकाळी १७/३० वा. ते १७/४५ वा.चे दरम्यान नाईक घाटे आर्किटेक्स ऑफिस समोर १२९० सुभाषनगर शुक्रवार पेठ पुणे येथे व्हेस्या गाडी क.एम.एच.१२ व्ही. वाय.०३५३ या गाडीचे डिक्की मधुन रोख ३,००,०००/- रुपये कोणीतरी अज्ञात घोरट्याने त्यांचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इरादयाने चोरुन नेले आहेत अशी तकार दिल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार यांनी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना रोख रक्कम चोरी झालेल्या भागातील सी.सी.टी. व्ही कॅमेरे तसेच बातमीदारकडे माहिती घेवून आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुषगाने अंमलदार पोलीस शिपाई ९११८ प्रमोद भोसले, पोलीस शिपाई ४९९४ कृष्णा गायकवाड, पोलीस शिपाई १०२६७ शेखर खराडे, पोलीस शिपाई ९१०२ अक्षयकुमार वाबळे, पोलीस शिपाई ४८८८ संतोष बारगजे यांनी बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा आरोपी हा टिंबर मार्केट परिसरात आले असलेबाबत बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पो.उप-निरी. प्रल्हाद डोंगळे, पोलीस हवालदार २८४२ हर्षल दुडम, पोलीस शिपाई ९११८ प्रमोद भोराले, पोलीस शिपाई ४९९४ कृष्णा गायकवाड, पोलीस शिपाई १०२६७ शेखर खराडे, असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणाचे जवळपास आडबाजुस खाजगी वाहन पार्क करुन सर्व स्टाफ बातमीचे ठिकाणी पायी पायी जावून, स्टाफचे मदतीने बातमीचे ठिकाणी वेगवेगळे पथक करुन सापळा रचुन पाहणी करता बातमीप्रमाणे एक इसम टिंबर मार्केट भवानी पेठ याठिकाणी उभे असलेला दिसला त्याची व स्टाफची नजरानजर होताच ते त्या ठिकाणाहून नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानच त्यांना स्टाफचे मदतीने पाठलाग करून काही अंतरावर त्यांना शिताफीने पकडून त्यास त्यांचे नाव व पता विचारले असता त्याने त्याचे नाव कुमार विजय शिंदे वय ४१ वर्षे रा. मल्हार मार्तड सोसायटी, फैलट नं. ५०२. सहकारनगर, पुणे असे सांगितले. त्यास दिनांक १८/०८/२०२४ रोजी ०४/०५ वा. अटक करण्यात आली. त्यास एकूण दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून तपासादरम्यान त्याला चोरलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता त्याने सदरची ३,००,०००/- रूपयांची रोख रक्कम त्यांची बजाज कंपनीच्या चेतक दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवल्याचे सांगितल्याने दोन पंचासमक्ष सदरची एकूण ३,००,०००/- रूपये रोख रक्कम व दुचाकी त्याची किंमत एकूण १,००,०००/- रूपये असा एकूण ४,००,०००/- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केली असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. अनिल सुरवसे हे
करीत आहे.
नमुद कारवाई श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्रीमती नूतन पवार, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री शशीकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहा. पो.निरी. श्री. अनिल सुरवसे, पो.उप-निरी. श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, पोलीरा अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, शेखर खराडे, लखन ढावरे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, समीर भोरडे, भालचंद्र दिवटे, मयूर काळे, संतोष बारगजे, उमेश मठपती, यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

