अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे भट्टी व त्यामधील तयार हातभट्टी दारु पकडून ३०४५ लिटर गावठी दारू गाडीसह जप्त…
पंकेश जाधव संपादक 7020794626
काळेपडळ पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचासंहिताच्या दरम्यान पुणे शहरात अवैध धंदे वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेले आदेश/सुचनांप्रमाणे दिनांक २४/१०/२०२४ काळेपडळ तपास पथकातीत अधिकारी व अंमलदार पोलीस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस हवालदार, ७९५० संजय देसाई, पोलीस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस हवालदार ७८३५ अमोल काटकर, म.पो.नाईक ७१४३ स्नेहल जाधव, पोलीस शिपाई २४३३ महादेव शिंदे, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी, पो.शि.८६८७ गणेश माने, पो.शि.८२१३ श्रीकृष्ण खोकले असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार २४३३, महादेव शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे इसम नामे सचिन कचरावत व मानेश कचरावत हे दोघे मिळून त्याचे राहते घरापाठीमागे या ठिकाणी गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे
साहीत्य गोळा करुन, दारु काढणेची भट्टी लावून, गावठी हातभट्टी दारु गाळण्याचे तयारीत आहेत. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे मा. मानसिंग पाटील, वपोनि साो. काळेपडळ पोलीस ठाणे व वर नमूद पोलीस स्टाफ यांनी संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु गाळणारे दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव १. सतिश प्रकाश कचरावत, वय ४३ वर्षे, रा. संतोषनगर, कंजारभट वस्ती, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे, २. मानेश प्रकाश कचरावत, वय ३५ वर्षे, रा. सदर असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण ८७ कॅन व चार चाकी स्विफ्ट गाडी कार असा एकुण ८,७२,०००/- रु. कि.चा मुद्देमाल पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे.
त्याबाबत वानवडी पोलीस ठाणेस गु.र.नं.५५६/२०२४ प्रमाणे भा.न्या.सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ब) (क) (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त साो. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस उप निरीक्षक प्रशांत लटपटे, पोलीस हवालदार, ७९५० संजय देसाई, पोलीस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस हवालदार ७८३५ अमोल काटकर, म.पो.नाईक ७१४३ स्नेहल जाधव, पोलीस शिपाई २४३३ महादेव शिंदे, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी, पो.शि.८६८७ गणेश माने, पो.शि.८२१३ श्रीकृष्ण खोकले यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

