दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 02,गुन्हे शाखा ,पुणे शहर यांचेकडून वाहन चोरीचे 06 गुन्हे उघड
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी सपोनी बेरड हे पथकातील स्टाफसह हडपसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे व संदीप येळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीचे आधारे इसम नामे 01) रमेश लोकेश राठोड वय 19 वर्ष रा. बकोरी गाव वाघोली पुणे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे ताब्यातील पल्सर गाडी चोरीची असले बाबत निष्पन्न झालेने त्यांस बी.एन. एस. एस. 35(1) (ड) प्रमाणे ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्याने ईसम नामे 02) प्रसाद संतोष भोंडवे वय 21 वर्ष रा. सणसवाडी तालुका शिरूर व 03) विधी संघर्षित बालक,यांनी पुणे शहर हद्दीत दुचाकी वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून एकूण 06 वाहने किंमत 1,05,000/- चा मुद्देमाल जप्त केला. खालील 06 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
01) हडपसर पो.स्टे =
गुरनं.108/2025 BNS
303(2),
02) हडपसर पो.ठाणे
गुरनं,78 /2025 BNS
303 (2)
03) फरासखाना पोलीस स्टेशन= गुरनं,24/2025
BNS 303(2)
04) लोणीकंद पोलीस स्टेशन= गुरनं,100/2025
BNS 303(2)
05) लोणीकंद पोलीस स्टेशन= गुरनं,101/2025
BNS 303(2)
06) मुंढवा पोलीस स्टेशन = गुरनं. 37 2025
BNS 303(2)
वरील प्रमाणे गुन्हे उघड झाले असून आरोपी तास लोणीकंद पोस्टे यांचे ताब्यात पुढील कारवाई कामी वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह दिले आहे. तसेच 1 विधी संघर्षित बालक असल्याने त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात दिले आहे.
सदर ची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे सो , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. विवेक मासाळ सो, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे (2) श्री. राजेंद्र मुळीक सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन पवार यांचे मार्गदर्शना खाली सपोनी ,सी बी बेरड, पोलीस अंमलदार राजेश लोखंडे, अशोक आटोळे, दिनकर लोखंडे,सुदेश सपकाळ, मनोज खरपुडे, संदीप येळे, अमोल सरतापे, सुरेश जाधव यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

