अमरावती मध्यवर्ती कारागृहात सामाजिक संस्थेच्या सहकार्याने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

अमरावती मध्यवर्ती कारागृह अमरावती

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– मा.श्री.सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा.श्री.योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच मा.कारागृह उपमहानिरीक्षक, पूर्व विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 09/08/2025 रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे अशासकीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी सौ.जया बद्रे, महिला व बालकल्याण सुरक्षा समिती सौ.बरखा बोज्जे, जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था व सौ.योगिता लुल्ला, महिला उत्थान मंडळ, अमरावती या संस्थेचे पदाधिकारी व महिला सदस्य उपस्थित होत्या. सदर महिलांनी कारागृहातील विविध गुन्हयात शिक्षा भोगत असणारे बंदीबांधव यांना राखी बांधून त्यांचे कारागृहातून लवकर सुटका व व्हावी व नंतरचे आयुष्य चांगल्या मार्गाने जावे यासाठी प्रार्थना केली. यावेळी बंदीबांधवांना त्यांचे बहिणीची आठवण झाल्याने ते भावूक झाले होते.

सदर संस्थेने सामाजिक जबाबदारी म्हणून कारागृहातील बंदयासाठी आपला अमूल्य वेळ देऊन सामाजिक भान राखले याबद्दल कारागृह अधीक्षक श्रीमती किर्ती चिंतामणी यांनी सदर महिलांचे कौतुक केले. तसेच यावेळी महिला उत्थान मंडळ या संस्थेच्या महिलांनी कारागृहाचे सुशोभीकरणासाठी तुळशीची रोपे दिली असून त्याचा कारागृहातील जागेत सुशोभीकरणासाठी वापर करण्यात येणार असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती चिंतामणी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री.देवराव जाधव, अंतर्गत सुरक्षा अधिकारी श्री.शामराव गिते, मंडल तुरुंगाधिकारी श्री.उमेश गुंडरे, कारागृह शिक्षक श्री.संजय घोलप, श्री.ललित मुंडे, इ. उपस्थित होते. सदर रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजनामध्ये कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:चे घरातील सणउत्सव बाजूला ठव बहिणींकडे रक्षाबंधनास जाण्यापूर्वी कर्तव्याचा भाग म्हणून अगोदर कारागृहातील बंदयासाठी रक्षाबंधन कार्यक्रम सुरळित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. यावेळी कारागृहातील बंदयांना त्यांचे घरुन पोस्टाने बहिणींकडून वेळेवर राख्या प्राप्त झाल्याने कारागृहातील वातावरण आनंदाचे व उत्साहाचे होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!