जमिनीतुन गुप्त धनाचा हांडा काढुन देतो” असे सांगुन फसवणुक करणारा भोंदु बाबा जेरबंद


सोलापूर गुन्हे शाखा 
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महापोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- अर्जदार गोविंद मल्लिकार्जुन वंगारी रा. सोलापूर यांची इसम नामे मोहम्मद कादर शेख याने, अर्जदार यांचे राहते घरामधुन गुप्त धनाचा हांडा काढुन देण्याचे अमिष दाखवुन, फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिण्यास देवुन जादुटोणा केला व त्याकरीता त्यांचेकडुन वेळो वेळी १,८७,३१,३००/-रू रोख रक्कम घेवुन त्यांची फसवणुक केले बाबतचा तक्रारी अर्ज, मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांचेकडे केला होता. नमूद तक्रारी अर्ज पुढील चौकशीकरीता गुन्हे शाखेस प्राप्त होता. सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील, श्री दत्तात्रय काळे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी करुन, त्याप्रमाणे, जेलरोड पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गुरनं. ५१५/२०२५ भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४१७, ४२० व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ चे कलम ३ (२) अन्वये, दिनांक ०९/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास, श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचेकडे देण्यात आला.
श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेवुन, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मोहम्मद कादरसाब शेख याचा शोध घेण्याकरीता गुन्हे शाखेकडील ०४ तपास पथके रवाना केली. त्यापैकी, सपोनि/दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकास सदर आरोपी हा विजापूर, राज्य कर्नाटक येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. परंतु, त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही. त्यानंतर, मिळालेल्या बातमीप्रमाणे, दिनांक ०९/१०/२०२५ रोजी, श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री दत्तात्रय काळे, सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर असे तपास पथकासह विजापूर, राज्य कर्नाटक येथे जावुन आरोपी मोहम्मद कादरसाब शेख हा आदिलशाही नगर, जर्मन बेकरी जवळ येथे असल्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर आरोपीस त्याचे राहते घरातुन ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावेळी त्याचे ताब्यातुन जादुटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर, नमुद आरोपीस मा. न्यायालया समक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक १३/१०/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री अरविंद माने, गुन्हे शाखा, सोलापूर शहर हे करीत आहेत. सोलापूर शहरातील नागरीकांना आवाहन करणेत येते की, त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणुक झाली असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!