पुण्यात ग्लोरिअसग्लोबल सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रीडम फाउंडेशन’च्या २६ गौरवशाली वर्षांचा उत्सव संपन्न,समाजसेवेचा सुवर्ण अध्याय!


महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन चिखली,पुणे : मानवतेची सेवा, समाजउन्नती आणि शांततेच्या मूल्यांचा प्रसार यासाठी गेली २६ वर्षे कार्यरत असलेल्या फ्रीडम फाउंडेशन या संस्थेच्या कार्याचा गौरवशाली टप्पा नुकताच पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने फ्रीडम फाउंडेशन आणि ग्लोरिअस ग्लोबल सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या समाजसेवकांना “विश्व शांतीदूत पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या भव्य सोहळ्यात ग्लोरिअस सिनेट बोर्डचे माननीय सदस्य बिशप अजितकुमार फरांदे, बिशप सुहासिनी फरांदे, बिशप विजय भोपानी, रेव्ह. रेखा,रेव्ह. चार्ल्स सत्राळकर,रेव्ह. प्रेमचंद लोंढे आणि पा.डॉ प्राजक्ता राठोड हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व अध्यक्ष डॉ. अनिश विजागत आणि प्रो. ज्युलिया विजागत (अध्यक्ष), बिशप प्रदीप वाघमारे (संस्थापक व विश्वस्त) आणि पा. डॉ. साधना कदम (सेक्रेटरी) यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. प्रफुल्ला ताई मोतलिंग (महिला अध्यक्षा, माहिती अधिकारी पुणे व भारत राष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य), श्री. वाजिद सय्यद (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग), श्री. प्रशांत इलकल (प्रसिद्ध उद्योजक) आणि श्री. दीपक अण्णा चक्रनारायण (संस्थापक अध्यक्ष, ख्रिस्ती नवनिर्माण सेवा व इमॅन्युएल अनाथालय) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली.
“विश्व शांतीदूत पुरस्कार” प्राप्त समाजसेवकांमध्ये श्री. प्रेम व्हिमल सर (डायरेक्टर – हेल्पिंग हँड्स लीगल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडिया, संस्थापक अध्यक्ष – हेल्पिंग हँड्स मिशन इंडिया कौन्सिल आणि कायदेविषयक सल्लागार), अॅड. बाजीराव दळवी, श्री. राजेंद्र धामणे, श्री. डी. जी. भामरे, डॉ.प्रवीण बढे, श्री. सुनील उबाळे, श्री. मनोज येवलेकर, श्री. वसंत आर. बांदवणे, पास्टर डॅनियल अँथनी, श्रीमती भारती व्ही. फरांदे, रेव्ह. रॉबिन महाडकर, इव्हान्जेलिस्ट कर्नल अलंकामणी आणि श्री. ओमप्रकाश सिंग यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
समाजहिताच्या दृष्टीने या सोहळ्यात एच. व्ही. देसाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. “डोळ्यांत नवा प्रकाश, जीवनात नवी दिशा” या घोषवाक्याखाली नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व तज्ञ सल्ला या सेवा नागरिकांना मोफत देण्यात आल्या.
हा कार्यक्रम ११ ऑक्टोबर २०२५ रोजी शेलारवस्ती, चिखली, पुणे येथे पार पडला. या उपक्रमाने समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला असून, शांतता, प्रेम आणि मानवतेचा संदेश अधिक दृढपणे समाजात रुजविण्याचे कार्य फ्रीडम फाउंडेशनने, ग्लोरिअस ग्लोबल सोशल फाउंडेशनच्या संयुक विद्यमाने पुन्हा अधोरेखित केला आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!