वैश्या व्यवसायासाठी डांबुन ठेवलेल्या बांग्लादेशी दोन तरुणींची सुखरुप सुटका, आरोपीस अटक


प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-  १०/१०/२०२५ रोजी सुमा, पिडीत महीलेने तिला वेश्या व्यवसायासाठी एक इसम जबरदस्तीने घेवुन जात आहे असा कॉल नियंत्रण कक्षाकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील अंमलदारांनी कॉल प्रमाणे महीलेचा शोध घेतला असता ती कात्रज परीसरात सुखरुप मिळुन आली असुन तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने सांगितले की, तिस गावावरुन ब्युटी पार्लरचे काम लावुन देते असे आमिष दाखवुन पुणे, महाराष्ट्र येथे आणुन ब्युटी पार्लरचे कामास न लावता आरोपी महीला व तिचे पती पुरुष यांनी तिच्याकडुन वेश्या व्यवसाय करवुन घेवुन त्यातुन मिळणारे रक्कम ही न देता ती रक्कम स्वतःच्या उपजीविके करीता वापरली आहे तसेच त्यांनी डांबुन ठेवून, शिवीगाळ, मारहाण करुन व धमकावून छळ व पिळवणुक केली असलेबाबत तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४६०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ कलम १४३.१२७ (२),१२७ (३), ११५(२), ३५१(२), ३५२,३ (५), अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४.५.६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लागलीच गुन्हयाचे तपासी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी गुन्हयाचा कशोशीने तपास करुन, गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त झालेल्या बातमीवरुन आरोपीचा आंबेगाव पठार भागात शोध घेत असताना आरोपीचे फ्लॅटमधुन वैश्या व्यवसायाकरता डांबुन ठेवलेल्या दुसऱ्या पिडीत मुलीची सुखरुप सुटका केली असुन, आरोपीस २४ तासाचे आतमध्ये अटक केली आहे. पिडीत महीलांकडे केले तपासामध्ये त्यांना गुन्हयातील दोन्ही आरोपींनी ब्युटी पार्लरचे काम देण्याचे व त्या कामातुन भरपुर पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवुन बांग्लादेश येथुन आणुन वैश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि २. श्री. मिलींद मोहीते मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस उप निरीक्षक अंजली खोब्रागडे, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चौरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महीला अंमलदार नम्रता करें, सोनाला कामठे यांच्या पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!