आनंदाचा शिधा बंद करून फसवले – काशिनाथ नखाते


डॅनियल अँथनी पुणे ब्युरो चीफ
महापोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी दि. १८ – २०२२ पासून महाराष्ट्र सरकारने ” आनंदाचा शिधा ” ही योजना राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी आणली यात प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल, १किलो चणाडाळ या वस्तू केवळ १०० रुपयात देण्यात येत होत्या यामध्ये प्रामुख्याने गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि दिवाळी यासारख्या सणांमध्ये दिले जात होते. कष्टकरी आणि सामान्य नागरिकांची दिवाळी यंदा साजरी होणार नाही आता चटणी भाकरीच गोड मानून दिवाळी साजरी करावी लागणार आहे त्यामुळे नागरिकात प्रचंड नाराजी असून सरकारने आनंदाचे शिधा योजना बंद करून नागरिकांना फसवले अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते आणि व्यक्त केली.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रतर्फे आज झालेल्या बैठकीत सर्व कामगारांनी या योजनेबाबत सरकारला जाब विचारत ” निवडणुका सरो, मतदार मरो ” अशी सरकारची भूमिका असल्याचेही नमूद केले
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, हरी भोई, सुनील भोसले,वसंत कदम, अनिता जाधव ,रंजना मोरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील १ कोटी ६० लाख लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहे आणि सरकार केवळ लाडकी बहीण – लाडकी बहीण च नाव पुढे करून शिवभोजन बंद करण्याच्या मार्गावर आहे आणि आनंदाचा शिधा बंद केला आहे. यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे फार मोठे नुकसान झालेले आहे मजुरांना रोजगारही नाही अशा ठिकाणी वास्तविक आनंदाचा शिधा देणे गरजेचे असताना वास्तविक गरिबी निर्मूलन आणि दारिद्र्य निर्मूलन ची योजना सरकारकडे अजिबात नाही . दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण २५.७ % असताना केवळ आकडेवारीचा खेळ दाखवून आम्ही कमी केल्याचे सरकार म्हणत आहे. अशा गरजू आवश्यक योजना बंद करणे चुकीचे आहे केवळ निवडणुका तोंडावर ठेवूनच अशा वेगवेगळ्या प्रकारचे योजना आणणे आणि त्या झाल्या की बंद करणे असा सरकारचा डाव आहे .

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!