उरूळी कांचन पो स्टे हद्दीत मिळून आलेल्या युवतीचे मृतदेहाची ओळख पटवून खूनाचा गुन्हा उघडकीस आणून एका आरोपीस केले जेरबंद.
विशाल धाकतोडे पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे ;- उरूळी कांचन पो स्टे हद्दीत मिळून आलेल्या युवतीचे मृतदेहाची ओळख पटवून खूनाचा गुन्हा उघडकीस आणून एका आरोपीस केले जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखा व उरूळीकांचन पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण ची कामागिरी
उरुळीकांचन पोलीस स्टेशन गु.र.नं. २८३/२०२५ भा.न्या.सं.क १०३(१) प्रमाणे दि. १४/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे, दि १४/१०/२०२५ रोजी १९/३० वा सु तास सदर गुन्हयातील मयत युवती नामे पुनम विनोद ठाकूर वय २० वर्षे व्यवसाय नोकरी, रा. गगण आकांक्षा सोसायटी कोरेगाव मुळ, ता. हवेली जि पुणे हिचा उरूळीकांचन ते नायगाव रोडवरील प्रयागधाम हॉस्पिटलचे जवळ असणारे गगन आकांक्षा सोसायटीकडे जाणारे रोडलगत मृतदेह मिळून आला. तिचा मोबाईल फोन, चप्पल, सॅक, त्या ठिकाणीच पडलेली होती. तिचे डोक्याला जखम झालेली होती, रक्त सांडलेले होते. तिचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून डोक्यात कशानेतरी मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारून खून केला असलेबाबत मयत युवतीचा भाऊ मनिष विनोद ठाकूर वय २३ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. गगण आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, ता. हवेली जि पुणे याने फिर्याद नोंदविल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.
लोकवस्ती नजीक पायी जाणारे युवतीचा खून झाल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेवनू मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री. सुनिल फुलारी साो. कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांना अवगत करून त्यांनी केलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व उरूळी कांचन पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांची चार पथके तयार करणेत आली. तपास पथकांनी घटनास्थळापासून जाणारे येणारे रोडवरील सुमारे ६०-७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मयत मुलीचे संपर्कातील तसेच परिसरातील सुमारे २००-२५० व्यक्तीकडे तपास करणेत आला. सदर गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुन्हा सर्व तपास पथकांची बैठक घेवून तपासातील प्रगती जाणून घेतली आणि महत्त्वाच्या सुचना केल्या त्याप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना एक संशयित व्यक्ती मोटार सायकलवरून घटनास्थळाचे दिशेने जाताना दिसला, परंतु तो घटनास्थळापासून पुढे गेल्याचे आढळून आले नाही. त्याचप्रमाणे सदरचे सीसीटीव्ही फुटेज हे परिसरातील गोपनीय बातमीदार तसेच नागरीकांना दाखविणेत आले, गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फुटेज मधील संशयित व्यक्ती हा दिनेश संजय पाटोळे रा. गोळेवस्ती उरुळीकांचन ता. हवेली जि पुणे हा आहे, अशी माहिती मिळाली.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनेश पाटोळे याचेवर लक्ष केंद्रीत करून त्याचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले, त्याच्या दिनक्रमात व हालचालींमध्ये संशय वाटल्याने आरोपी नामे दिनेश संजय पाटोळे वय २६ वर्षे, रा. गोळेवस्ती उरूळीकांचन ता. हवेली जि पुणे यास ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेवून तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयातील मयत युवती ही रोडने एकटी पायी चालत जात असल्याचे पाहिले आणि तिचा पाठलाग करून आरोपीने तिचेकडे शरीर सुखाची मागणी केली, मुलीने नकार देवून विरोध केल्याने आरोपीने तिचे तोंड दाबून झुडूपात नेले परंतु युवतीने आरडा ओरडा केला त्यामुळे आरोपीने रागाचे भरात तिचे डोक्यात दगड मारला आणि युवतीचा खून केला. असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयाचा अधिक तपास करावयाचा असल्याने आरोपी दिनेश पाटोळे याची पोलीस कोठडी रिमांड मिळणेकामी त्यास मा. न्यायालयात उपस्थित केले असता, त्याची दि. २७/१०/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे. आरोपीने गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर मो.सा. नं. एम.एच.१२ एस. झेङ ६९६५ ही जप्त करणेत आली असून ती मोटार सायकल त्याचेच नावावर आहे.
सदरची कामगिरी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री सुनिल फुलारी साो, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली, मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बापूराव दडस, दौंड विभाग, यांचे सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरुळी कांचन पो स्टे चे पो नि सचिन वांगडे, उरूळी कांचन पो स्टे चे स.पो.नि. ज्ञानेश्वर बाजीगरे, स्था.गु.शा.चे सपोनि दत्ताजीराव मोहिते, पोसई अमित सिदपाटील, श्रेणी पोसई ईश्वर जाधव, स्था.गु.शा.चे अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, राजु मोमीण, अतुल डेरे, धिरज जाधव, भारत मोहोळ, रमेश भोसले, सुनील सस्ते, अजित काळे, कमलेश होले, विशाल रासकर, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, प्रविण चौधर, निलेश जाधव, सचिन जगत जगताप, हरिश शितोळे, सुजाता भुजबळ, सावित्रा सांगडे, सुमित वाघ, दिपक यादव, सोमनाथ सुपेकर, सुवर्णा गायकवाड, ऋषीकेश रासकर, अश्वजीत मोहोड, अमोल खांडेकर, अमोल राउत, राजकुमार भिसे यांनी केली असून पुढील तपास उरुळीकांचन पोलीस स्टेशन करत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

