नवीन पनवेल परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते त्यामुळे तेथील नागरिक तोंडी लेखी , सोशल मीडियाद्वारे वारंवार तक्रार करत होते


श्रावणी कामत पुणे प्रतिनिधी 
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पनवेल रेल्वे स्टेशन पूर्व बाजू एचडीएफसी सर्कल ते विचुंबे ब्रिज तसेच पनवेल रेल्वे स्थानक ते भाटिया हायस्कूल या दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस टू व्हीलर वाहनांची पार्किंग होत असल्याने सदरच्या दोन्ही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती सदरच्या वाहतूक कोंडीमुळे ॲम्बुलन्स तसेच इतर अत्यावश्यक वाहनांना जाण्या येण्यास उशीर होत असल्याने नवीन पनवेल परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते त्यामुळे तेथील नागरिक तोंडी लेखी , सोशल मीडियाद्वारे वारंवार तक्रार करत होते.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन मा. डीसीपी सर, एसीपी सर वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाने रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडील डम्पिंग प्लॉटची साफसफाई करून अंदाजे 500 ते 600 दुचाकी वाहने पार्किंग होतील असा प्लॉट उपलब्ध केला सदर प्लॉटवर वाहने पार्क करण्याच्या सूचना देण्याकरिता मा एसीपी सर वाहतूक शाखा यांनी एसीपी स्ट्राइकिंग वरील अंमलदार उपलब्ध करून दिल्याने सतत मागील 7 दिवस सकाळी 7.00 वाजेपासून लोकांना सूचना देऊन वाहने नवीन पार्किंग प्लॉट मध्ये पार्क करण्यास सांगितली त्यामुळे मागील दहा वर्षापासून ची पनवेल रेल्वे स्टेशन पूर्व बाजूकडील वाहतूक कोंडीची समस्या पूर्णतः मुक्ती झाल्याने व नवीन पनवेलकरानी मोकळा स्वास घेऊ लागले म्हणुन न्यू पनवेल रेसिडेन्शियल वेल्फेअर ग्रुप,जेष्ठ नागरिक, व स्थानिक नागरिकांकडून आज दिनांक 20.11.2025 रोजी सकाळी 8.00 वाजता *मा.श्री.विजय चौधरी* ACP,पनवेल शहर वाहतूक शाखे चे *श्रीऔदुंबर पाटील* वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर अधिकारी व अंमलदार यांचा गुलाब पुष्प देऊन नागरी सत्कार करण्यात आला व आभार व्यक्त करण्यात आले सदर

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!