परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये हरविलेले गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रम संपन्न


पंकेश जाधव  मुख्य संपादक 7020794626
परिमंडळ 5 पुणे शहर
महा पोलिस न्यूज! ऑनलाईन पुणे दिनांक २०/११/२०२५ व दिनांक २१/११/२०२५ रोजी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी हरविलेले /गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रमाचे परिमंडल स्तरावर आयोजन करण्याबाबत आदेशित केले होते.
त्यानुसार दिनांक २१/११/२०२५ रोजी ११:०० ते १३:०० या कालावधीमध्ये नेताजी मंगल कार्यालय, मांजरी रोड, आण्णसाहेब मगर कॉलेजसमोर, हडपसर, पुणे येथे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांचेकडून हरविलेले /गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले, सहा, पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांच्यासह परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामधील एकूण ९ पोलीस ठाणे यांच्याकडे Central Equipment Identity Register या पोर्टलवरुन प्राप्त तक्रारीमश्रील, तसेच पुणे शहर पोलीस Lost & Found या पोर्टलवरील तक्रारींमधील एकूण १७१ हरविलेले / गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. सदर मोबाईल पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते संबंधितांना परत करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी “मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमोल आहेत, आमच्या आठवणी याच्याशी निगडीत आहेत, मोबाईल हे आम्हाला आमच्या जवळच्या व्यक्तींकडून भेट म्हणून आलेले आहेत, आमचा महत्वाचा डेटा आमच्या मोबाईलमध्ये होता, हरविलेला मोबाईल परत मिळेल म्हणून आम्हाला अपेक्षा नव्हती, परंतु पोलीसांनी आमचे हरविलेले मोवाईल परत मिळविल्यामुळे आमवा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढला आहे” अशा भावना व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!