बाणेर पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! मनुष्यवधातील आरोपीचा दिल्लीत शोध घेवुन केली अटक.


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर,
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- बाणेर पोलीस स्टेशन कडील गु.र.नं.१६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०५,२३८ अन्वये गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची फिर्याद की, दि.२०/०७/२०२५ रोजी ०४/४५ वा.चे सुमा. फिर्यादी यांचे वडील हे न्यु पुना बेकरी बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे. येथे रस्ता क्रॉस करत असताना बालेवाडी गावचे दिशेने येणारे एका अनोळखी रिक्षा चालकाने फिर्यादी यांचे वडीलांना जोरात धडक देवुन गंभीर जखमी केले. फिर्यादी यांचे वडीलांना वेळेत वैदयकीय उपचार मिळाले नाही तर माझे वडील दगावतील हे माहिती असून सुध्दा रिक्षा चालकाने माझे वडीलास जमलेल्या लोकांचे मदतीने त्याचेच रिक्षामध्ये बसवून त्यांना कोणतीही वैदयकीय मदतकेली नाही व त्यांना रेंज हिल रेल्वे लाईन जवळ, ज्युनियर स्टाफ क्लब जवळ खडकी पुणे येथे जखमी अवस्थेत टाकल्याने व उपचार न मिळाल्याने मयत झाले. तसेच त्याना कोणी पाहू नये, कोणी ओळखू नये म्हणून निर्जन स्थळी टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांची अज्ञात इसमाविरुध्द कायदेशीर तक्रार आहे. “अशी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा दिल्ली येथे ऐरोसीटी व महिपाल परिसरात कोठे तरी राहत असल्याची गुप्त माहिती बाणेर पोलीसांना मिळाली असता सदर माहितीवरुन पोलीस तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक डाबेराव, पोलीस अंमलदार शिंगे, गायकवाड, आहेर हे आरोपीचा शोध कामी दिल्ली येथे रवाना झाले. सदर पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना नमुद आरोपीचा सतत ०७ दिवस दिल्ली येथे शोध घेवुन आरोपी नामे इसराइल मंगला गुर्जर, वय २२ वर्षे, रा. महिपालपुर रेडलाईट एरीया, महिपालपुर, दिल्ली गांव नौनेर पोस्ट, नगलिया भेवगजरौला, अमरोहा उत्तर प्रदेश यास अटक केली. सदर आरोपीस दि.१०/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त झाला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अलका सरग ह्या करीत आहेत..
सदरची कामगिरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४. पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती अलका सरग यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक के.बी डाबेराव, सहा. पोलीस निरीक्षक रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रितम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, रोहीत पाथरुट व स्वप्नील मराठे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!