फरासखाना पोलीसांची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी ! एक किलो सोने चोरी करुन, पोलीसांना गुंगारा कामगार आरोपीस शिताफिने पकडुन, एकुण १,२७,००,०००/- रु. कि. चे सर्व एक किलो सोने हस्तगत करण्यात यश… 


रवी गायकवाड पुणे प्रतिनिधी
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:-  दिनांक १६/१०/२०२५ प्रिसियस रिफायनरी, ७७६ बुधवार पेठ पुणे येथील दुकानात कामास असलेला कामगार प्रथमेश गणेश मंडले याने दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले १०० ग्रॅम वजनाचे, १० नग सोन्याचे बिस्कीट (एक किलो शुध्द सोने) लॉकरमधुन चोरी केल्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १९८/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षात घेता, पोलीस उप-आयुक्त श्री. कृषीकेश रावले यांनी फरासखाना प्रभारी श्री. उत्तम नामवाडे यांना आदेशीत करुन, तपास पथकातील पोलीस उ-निरीक्षक अरविंद शिंदे व सहा.पो. फौज. मोकाशी, पो.हवा.२१९२ नितील तेलंगे, पो.शि.८४०३ गजानन सोनुने, पो.शि.१०३१२ चेतन होळकर अशी टिम तयार केली. त्यानंतर टिमने यातील कामगार आरोपी प्रथमेश गणेश मंडले वय १८ वर्षे, रा. पाचेगांव बु. ता. सांगलो, जिल्हा. सोलापुर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, त्याने त्याचा मोबाईल क्रमांक बंद करुन ठेवल्यामुळे, तो त्याचे अस्तीत्व तसेच राहण्याचे ठिकाण वारंवार बदलुन, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर, विजापुर कनार्टक राज्य, आंध्रप्रदेश येथील विजयवाडा याभागात त्याचा पाठलाग करुन, अखेर त्यास जत जिल्हा सांगली येथुन ताब्यात घेवुन, त्यास गुन्हयात अटक करुन, पोलीस कस्टडी दरम्यान त्याने वेग-वेगळया ठिकाणी लपवुन ठेवलेले सोने तसेच काही सोने कोल्हापुर येथील कारागीर नामे शकील बशीर मोमीन वय ४५ वर्षे, रा. ८४० लाईन बाजार, छावा गल्ली, कोल्हापुर यास विक्री केले होते. त्या सोने कारागीरास देखील गुन्हयात अटक करुन, एकुण १,२७,००,०००/- रुपये किमंतीचे सर्व एक किलो वजनाचे सोने हस्तगत करण्यात फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना यश आले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास अरविंद शिंदे, पोलीस उप-निरीक्षक हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त, श्री. कृषिकेश रावले पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे, श्रीमती अनुजा देशमाने सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक (अति. कार्य.) श्री. उत्तम नामवाडे, सपोनि, वैभव गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, सपोफौ कुष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी, पोलीस अंमलदार नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव, चेतन होळकर, अर्जुन कुडाळकर, तानाजी नांगरे, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, शशीकांत ननावरे, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, यांनी केलेली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!