युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर ची कौतुकास्पद कामगिरी ! हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकास परत मिळवुन दिले


प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी 
युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे  :- मा. वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे हरवलेले जास्तीत जास्त मोबाईलचा शोध घेणे कामी युनिट ६ कडील पोलीस हवालदार सारंग दळे व महिला पोलीस अंमलदार सोनाली नरवडे यांनी सीईआयआर पोर्टलवरील माहिती संकलित केली. संगणक विभागाचे महिला पोलीस अंमलदार तरंगे यांचे मदतीने मिसिंग मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून वाघोली पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे हद्दीतील हरविलेले वेगवेगळ्या कंपनीचे अंदाजे ५,११,०००/-रु. किंमतीचे एकुण २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे. सदरचे मोबाईल फोन हे त्यांचे मुळ मालकास परत देण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण गुन्हे शाखा युनिट-६ यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!