मुंढवा पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी ! दुचाकीवरुन हुक्का पिण्याचे साहीत्य विक्री करणा-या आरोपीस एकुण १,०३,१९०/- मुदेमालासह पोलीसांनी घेतले ताब्यात
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- याबाबत सविस्तर द्रुत्त असे की, दिनांक २८/११/२०२५ रोजी मुंढवा पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार १०७४० अक्षय धुमाळ व स्वप्निल रासकर यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने बी.टी. कवडे क्रिडांगण, घोरपडी पुणे येथे एक इसम अवैधरित्या हुक्का पिण्यासाठी लागणारे साहीत्य त्यांचे ओळखीचे ग्राहकांना तंबाखुजन्य फ्लेवर असलेला हुक्का सेवन करणेकरीता त्याचे दुचाकीवरुन येणार असल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती तपास पथकाचे प्रभारी सपोनि राजु महानोर व पोउनि युवराज पोमण यांना कळवुन, मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस स्टेशन याचे आदेशान्वये सदर ठिकाणी तपास पथकाचे पोलीस अंमलदारसह आज रोजी १९/३० वा चे सुमारास वर नमुद ठिकाणी छापा कार्यवाही करुन, आरोपी नामे १) शाहरुख बिलाल अहमद वय-२१ वर्षे धंदा-काही नाही राह- केअर ऑफ विशाल याचे भाड्याचे घरात अष्टविनायक चौक, साईनाथनगर, वडगावशेरी, पुणे मोनं ८९२८७६६१५७ यांस ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण १,०३,१९०/- कि. रु. ची एक यामहा कंपनीची मोसा व एक मोबाईल फोन व अवैध हुक्याचे साहीत्य असे गुन्हयाचेकामी ताब्यात घेवुन, सदर आरोपीविरुध्द ओळखीचे ग्राहकांना तंबाखुजन्य फ्लेवर असलेला हुक्का सेवन करणेकरीता पुरविण्यासाठी मिळुन आल्याने म्हणुन त्यांचेविरुध्द मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२६/२०२५ तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१-अ अन्वये कायदेशीर फिर्याद आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५. श्री. राजकुमार शिदे, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती. अनुराधा उद्द्मले यांचे अधिपत्याखाली, मुंढवा पोलीस स्टेशन कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोहवा राहुल मोरे, योगेश गायकवाड, पोलीस अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडेकर, यांचे पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

