युनिट तीन, गुन्हे शाखा यांच्याकडून रेकॉर्डवरील आरोपीकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केल्याबाबत


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
युनिट तीन, गुन्हे शाखा , पुणे शहर
महापोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :-  पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने त्यांच्या रेकॉर्डवरील एका सराईत आरोपीकडून एक गावठी पिस्टल (कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्याची महत्त्वाची कारवाई केली आहे. आज दिनांक 28/11/2025 रोजी पर्वती पोलीस ठाणे व सिंहगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदे व रेकॉर्ड आरोपी चेक करत असताना *पोलीस हवालदार अमित बोडरे व पोलीस हवालदार नितीन जगदाळे** यांना मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे मध्ये पर्वती पोलीस ठाणे हद्दीत एक इसम अवैध हत्यार घेऊन थांबलेला आहे . मिळालेल्या माहितीनुसार अलंकार पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील आरोपी नामे नरेंद्र महादेव बलकवडे वय 35 वर्ष, ,राह. गणेश नगर अलंकार पुणे **हा पर्वती कॅनल रोड वडगाव कडे जाणाऱ्या रोडच्या लगत पुणे या ठिकाणी मिळून आल्याने त्याच्या अंग झडतीमध्ये **एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे किंमत अंदाजे 41,000/- रुपये** असे मिळून आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावरती पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर /2025 आर्म एक्ट कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 आरोपीचे नाव – नरेंद्र महादेव बलकवडे वय 35 वर्ष
आरोपीचा पूर्व अभिलेख
1) अलंकार पोलीस ठाणे 152/13 भादवी कलम 307, 323,506(2) 2) अलंकार पोलीस ठाणे 23/20 भादवि कलम 324,34 सह आर्म ऍक्ट 4,25 , 3) अलंकार पोलीस ठाणे 129/19भादवी कलम 324 , 4) अलंकार पोलीस ठाणे 42/2019 भादवी कलम 143,147,148,352 , 5) अलंकार पोलीस ठाणे 98/2016 भादवि कलम 143,147, 148,149 व इतर 4 गुन्हे
सदरची कामगिरी हि मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहरश्री. पंकज देशमुख मा. पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १. पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे मा. प्रभारी पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राऊत यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उप-निरीक्षक पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, पोलीस अमंलदार जगदाळे ,अमित बोडरे अमोल काटकर, मारुती पारधी, कैलास निम्हण व तुषार किंद्रे यांचे पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!