हुक्का शौकिनांना काळेपडळ पोलिसांचा मोठा झटका; ७५ लाख ८० हजारांच्या मुद्देमालासह आरोपी अटकेत!
आकाश पांचाळ सह संपादक
काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज !ऑनलाईन पुणे :- आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे, अभिलेखांवरील आरोपीत इसम, तडीपार इसम, अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांना चेक करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनूशंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार महादेव शिंदे व अतुल पंधरकर यांना त्यांचे गोपनिय बातमिदारामार्फत माहिती मिळाली की, पिसोळी येथील एका फार्म हॉऊसमध्ये इसम नामे अनिस सय्यद हा व त्याचा साथीदार साद सय्यद हे पिसोळी फार्म हाऊस, आंबिका हॉटेल रोड, जगदंबा मार्ग जवळ, पिसोळी, पुणे येथे अनाधिकृतपणे, चोरुन लपुन-छपुन हुक्का विक्री करीत आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता ८ ते १० इसम हे अनाधिकृतपणे हुक्का पित असता मिळुन आले असता, सदर ठिकाणी छापा टाकून सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडुन ०३ चारचाकी, ०२ दुचाकी, १२ मोबाईल संच, ०८ हुक्का पॉट व तंबाखुजन्य हुक्का फ्लेव्हर व इतर साहित्य असे एकुण ७५,८०,७३९/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत काळेपडळ पोलीस ठाणे येथे गु. रजि.क्र.२९८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३(५) सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१-अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास अमित शेटे, सहा. पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही जीवन बेनिवाल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, अतुलकुमार नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, गिरीषा निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे मागदर्शनाखाली पो. नि. (गुन्हे) आण्णासो बाबर यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पो. निरी अमित शेटे, पोलीस उप निरीक्षक रघुवीर खोडा, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, निलेश देसाई, अमोल फडतरे, अतुल पंधरकर, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, नंदकुमार जावळे, ज्ञानेश्वर कुलाळ, अक्षय जगताप, शुभम पवार, मेघराज जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

