युनिट २. गुन्हे शाखेची दमदार कामगिरी ! खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्हयातील रेकार्डवरील पाहिजे आरोपीस केले जेरबंद
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
युनिट २. गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- दि.०२/०७/२०२ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील युनिट प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, नागनाथ राख व शंकर नेवसे असे युनिट २ हददीत गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करीत असताना नमुद पथकास मिळालेल्या बातमी वरुन खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक १४३/२०२६ भा.न्या.सं. कलम १०९,१९०,१९१. १९१/३. ११८/२, १२५,३५१/२,३५२, आर्म अॅक्ट ४/२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ मधील खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्हयातील रेकार्डवरील गुन्हेगार रोहन ऊर्फ राहुल महेश हिंगणेश्वर वय २२ वर्ष रा. बोपोडी पुणे यास पानसरे नगर येवलेवाडी कोंढवा पुणे येथे शिताफिने ताब्यात घेवुन खडकी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर आरोपीवर या पुर्वी खडकी पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्द गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस अंमलदार, उज्वल मोकाशी, नागनाथ राख, शंकर नेवसे, शिवानंद कायगुडे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विदया शिंदे, योगेश मांढरे, संदिप शिर्के, आजीम शेख, विशाल दळवी, सददाम तांबोळी, रुषिकेश व्यवहारे असे गुन्हे शाखा युनिट २ पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

