रेकॉर्डवरील आरोपी व अल्पवयीन मुलांना देशी बनावटीचे दोन पिस्टल, काडतुसे तसेच चोरीच्या बुलेटगाडीसह गुन्हे शाखा युनिट-०३ ने केले जेरबंद
पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट ३ ची कारवाई.
मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साहेब यांनी अवैध अग्निशस्त्र विरोधी विशेष मोहिम राबवुन गुन्हेगारांची माहीती मिळवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ०३ ने पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत कारवाई करीत असतांना युनिट-०३ चे स्टाफ यांस गोपनीय बातमीदारार्मत माहिती मिळाली की, दि. १७/१०/२०२७रोजी रात्री २१.३० वाजेच्या सुमारास ४ ते ६ डोक्यावर पगडी बांधलेल्या मुलांनी तक्रारदार इसमास “तु काल आमच्या सोवत का भांडला होता. असे म्हणुन शिवीगाळ करुन तक्रारदार इसमाचे दिशेने पिस्टलमधुन फायरींग करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला” म्हणुन हडपसर पो.स्टे.ला गु.र.नं ८८८/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०९ (१),३२४ (२),११५ (२), ३७२, आर्म अॅक्ट क.३/२७ सह म.पो. अधि. क ३७ (१) (३) १३४ अन्वये दाखल आहे.
सदर फायरींगच्या अनुषंगाने तसेच पाहीजे आरोपी शोध घेत असतांना युनिट-३ चे अधिकारी, अंमलदार यांना बातमी मिळाली कि भीमशक्ती नगर, झोपडपट्टी स्पाईन रोड, मोरेवस्ती, चिखली, पुणे. येथे काही इसम संशयीतरित्या गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने दुचाकी वाहनावरुन फिरत आहे. सदरची बातमीबाबत गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांनी गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांना याबाबतची माहीती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष कसबे, यांनी गुन्हे शाखा युनिट ३ कडील स्टाफ यांचे तिन पथक तयार करुन भीमशक्ती नगर, झोपडपट्टी स्पाईन रोड, मोरेवस्ती, चिखली, पुणे येथे जावुन सापळा लावून थांबले असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचे इसम भीमशक्ती नगर, झोपडपट्टी स्पाईन रोड, मोरेवस्ती चिखली पुणे येथे संशयित रित्या बुलेट गाडीवर थांबलेले दिसले. सदर इसमांना ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव १) विधिसंर्षीत बालक अ (२) विधिसंर्षीत बालक ब, (३) विधिसंर्षीत बालक क, तसेच विधीसंघर्षीत बालक यांच्या सांगण्यावरुन गंभीर गुन्हयातील आरोपी नामे अथर्व सोपान मारणे वय १९ वर्षे रा. राजविलास सोसायटी, फ्लॅट नंबर-१६. फेज-१, आंबेगाव बु.पुणे यास ताब्यात घेवून सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून
१) १,००,०००/- रुपये किंमतीची एक रॉयल इन्फील्ड कंपनीची काळया रंगाची बुलेट गाडी
२) ८०,०००/- रू चे दोन देशी बनावटीचे ७.६४७ एम.एम पिस्टल
३) २,०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस १,८२,०००/- रु. येणे प्रमाणे मुद्देमाल मिळून आलेला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष कसबे, सपोनि दत्तात्रय गुळीग, पोलीस हवालदार, बाबासाहेब गर्जे, गणेश महाडीक, सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, श्रींधन इचके, लोनकर, भोसुरे, तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब भांगले, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, अमोल वेताळ, तुषार वराडे, दिलीप राठोड, शशिकांत नांगरे, सुधिर दांगट, योगेश्वर कोळेकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

