पोलिसांच्या आरोग्याशी खेळ थांबवा! सांडपाण्याच्या विळख्यात तसेच त्यात साठलेल्या कचऱ्याची दुर्गंधीमध्ये भवानी पेठ पोलीस लाईन; प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का


पुणे प्रतिनिधी उषा सोनावणे
स्थानिक नगरसेवक व पी डब्ल्यू डि यांनी झोपेचे सोंग घेतले का ???
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भवानी पेठ पोलीस लाईन येथील बिल्डिंग क्रमांक २ समोरील परिसरात अत्यंत गंभीर आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाली आहे. बिल्डिंगलगत असलेल्या नाना पेठ येथील एस.आर.ए. प्रकल्पातील तब्बल तीन इमारतींमधील सुमारे ६०० घरांचे वापरलेले बघरुमचे सांडपाणी पोलीस लाईनच्या सीमा भिंतीलगतून थेट आमच्या परिसरात येत आहे.
या सतत वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे बिल्डिंगसमोर मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचत असून, डास, माश्या व विविध प्रकारचे घातक कीटक निर्माण होत आहेत. परिणामी येथे वास्तव्यास असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित विभाग, पुणे महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत केवळ कागदोपत्री दखल घेण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
राज्याच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन एखाद्या पोलीस बांधवाचा किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा जीव गेल्यानंतरच जागे होणार का? असा संतप्त सवाल आता येथील नागरिक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित करत आहेत.
संबंधित विभागांनी या समस्येची तातडीने पाहणी करून सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, परिसराची स्वच्छता करून आरोग्याला निर्माण झालेला धोका त्वरित दूर करावा, अशी सर्व पोलीस बांधव व स्थानिक नागरिकांची एकमुखी मागणी आहे.
“पोलिसांचे आरोग्य सुरक्षित असेल, तरच समाजाची सुरक्षा अधिक सक्षम राहील.”
ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा नागरिक व पोलीस बांधवांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
भवानी पेठ पोलीस लाईन येथील पोलीस बांधव व स्थानिक रहिवासी

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!