दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची दमदार कामगिरी!दिड महिन्यांपासुन पाहिजे असलेल्या दरोडयाच्या गुन्ह्यातील ०२ आरोपी व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा,
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आगामी विधानसभा २०२४ चे अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे गस्त करीत असताना गस्ती दरम्यान स्टाफमधील पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अंभोरा पोलीस ठाणे, जि. बीड, येथील गु.र.नं २०८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) मधील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे १) रोहित वाघमारे, रा. वारजे माळवाडी, पुणे, २) शुभम धनवटे, रा. श्रीरामपुर, जि. अहमदनगर, व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक असे सार्वजनिक रोडवर उभे आहेत. अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदरची बातमी आम्ही वपोनि नंदकुमार बिडवई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी वरील नमुद निष्पन्न पाहिजे आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन कारवाई करण्याचे आदेशित केले होते.
प्राप्त बातमीचे अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख व स्टाफ असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन वरील पाहिजे आरोपींचा शोध घेतला असता नमुद वर्णनाचे तीन इसम हे सदर ठिकाणी दिसुन आल्याने स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांपैकी १) रोहित गुरुदत्त वाघमारे, वय २९ वर्षे, मुळगाव- माळीचिंचोरा, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. यशोदिप चौक, चौधरी बिल्डींग, वारजे माळवाडी, पुणे, २) शुभम चांगदेव धनवटे, वय २० वर्षे, मुळगाव- वडाळा महादेव, पाण्याच्या टाकीजवळ, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर, असे सांगितले व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तपासी अंमलदार यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन, अहमदनगर, गुन्हा रजि नं. ८५०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) व वाढीव कलम भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) या दाखल गुन्ह्यात सुध्दा त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले. नमुद आरोपींना पुढील कारवाईकरीता अंभोरा पोलीस ठाणे, जि. बीड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, अजित शिंदे, इरफान पठाण, दत्तात्रय पवार, मनिषा पुकाळे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, शिवाजी सातपुते, अक्षय गायकवाड, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

