लोणीकंद दुहेरी खून प्रकरणातील मोक्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीतास गुन्हे शाखा युनिट ६ ने घेतले ताब्यात


पंकेश जाधव संपादक 7020794626

युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- आज रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार व्यवहारे, ताकवणे, पवार यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस स्टेशन गु र नं 20/2022, कलम 302, 307, 341, 143, 147, 148, 149, 427 भा. द.वि. सह आर्म अँक्ट 3 (25), 4 (25), क्रि लॉ अमेंटमेंट अँक्ट 3, 7, महा. पोलीस कायदा कलम 135, (1), (3), सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3, 1, (i), 3, 2 मधील *पाहिजे आरोपी ऋग्वेद उर्फ जालिंदर, वय 23 रा. पेरणे टोलनाक्याजवळ, पेरणे, ता. हवेली, जि. पुणे* हा राहते घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बातमीच्या अनुषंगाने त्याच्या राहते परिसरात सापळा रचला असता तो सदर ठिकाणी आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सन 2022 मध्ये वर नमूद आरोपीने त्याचे इतर साथीदारांचे मदतीने जुने भांडणाचे वादातून इसम नामे प्रथमेश शिंदे व त्याचे वडील यांचा खून केला होता. सदर गुन्ह्यात मोक्का कायद्याचे कलम वाढवण्यात आले होते.

सदर आरोपीतावर यापूर्वी खून, गंभीर दुखापत, व बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे नोंद आहेत. 

आरोपीताचा गुन्हे अभिलेख –

Advertisement

1. लोणीकंद पो स्टे गु र नं – 20/2022 भा दं वि कलम 302, 307, 341, 143, 147, 148, 149, 427, आर्म अँक्ट 3(25), 4(25), क्रि लॉ अमेंटमेंट अँक्ट 3, 7, महा. पोलीस कायदा कलम 135, (1), (3), सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1), (i), 3 (2) प्रमाणे

2. लोणीकंद पो स्टे गु र नं – 846/2020 भा दं वि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे

3. लोणीकंद पो स्टे गु र नं – 592/2021 भा ह का कलम 4 (25) सह म पो का कलम 37(1), 135

4. शिक्रापूर पो स्टे गु र नं – 563/2018, भा दं वि कलम 302, 120 (ब), 34

वर नमूद आरोपीतास पुढील तपासकामी मा. सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे प्रभारी अधिकारी श्री. वहीद पठाण व त्यांचा स्टाफ यांनी केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!