चिमुकल्या कळ्या उमलण्याआधीच कोमेजल्या ! शरद पवार गटाची पुण्यामध्ये बॅनरबाजी…


पत्रकार प्रमोद सावंत पुणे शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगित अत्याचारप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात शनिवारी पुणेकरांचा आक्रोश पहायलामिळाला.कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेविरोधात आपल्या पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांनी आपल्या त्याच शैलीत या घटनेचा निषेध व्यक्त केला. पुण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्यावतीने संपूर्ण कोथरूड परिसरात असे फलक लावून महाराष्ट्रामध्ये आपल्या बहिणींवर चालेल्या अत्याचारात विरोधात आवाज उठवला. या फलकांवर चिमुकल्या कळ्या उमलण्या आधीच कोमेजल्या ! आईला १५०० रुपये तुम्ही दिले पण माझ्या सुरक्षेचं काय ? मुख्यमंत्री मामा, महाराष्ट्राला लाडकी बहीण नाही, सुरक्षित बहीण योजना पाहिजे..!

Advertisement

नराधमाला फाशीच द्या..! बदलापूर #पुणे #अकोला#मुंबई #लातूर उल्लेख करण्यात आला आहे. असा बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये गेल्या आठवड्यात दोन चार वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं होतं.

पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी १२ तास लावले आणि शाळा प्रशासनानेही घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट पसरली होती. शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर बंदची हाक देत आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून शाळेबाहेर पालकांनी निदर्शने केली. बदलापूर रेल्वे स्थानकावर लोकांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे बदलापूर रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली होती.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!