विश्रामबाग पोलीस स्टेशनची कौतुकाश्प्द कामगिरी !खुनाचा प्रयत्न करुन ४ महिन्या पासुन फरार आरोपी केले अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर, गुन्हा रजिस्टर नंबर ७६/२०२४ भारतीय दंड संहिता, कलम ३०७,३२३ अन्वये दाखल गुन्हयातील आरोपीत नामे सिध्दार्थ दत्तात्रय मोरे याने दिनांक १४/०४/२०२४ रोजी त्याचा मित्र व फिर्यादी हे जयंती पाहण्यासाठी नवी पेठ येथे आले असता आपण सोबत जेवन करु असे म्हणुन फिर्यादीस दुचाकी चालविण्यास सांगुन पाठीमागे बसुन घोलप मटन शॉप समोर पोहचले असता फिर्यादीचे पाठीमागे बसलेल्या आरोपीने पुर्वीचे भांडणाचा राग मनात धरुन धारधार हत्याराने मानेवर वार करुन “आज मी तुला सोडणार नाही, तुला खल्लास करतो, तु खुप दिवसानंतर सापडलास” असे म्हणुन फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे. आरोपी हा गुन्हा नोंद झाल्यापासुन फरारी असल्याने आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती विजयमाला पवार यांनी तपास पथकास आदेशीत केले होते.
दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील अंमलदार सचिन अहिवळे यांनी तांत्रीक विश्लेषनाचे आधारे व गोपणीय खब आचे मदतीने आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे वय २६ वर्षे रा. सेनादत्त पेठ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळयामागे, पुणे हा त्याच्या पत्नीस भेटण्यास नहि येथे येणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळवली असता सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, व पोलिस स्टॉप यांनी सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परि १ श्री. संदिपसिह गिल, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अरुण घोडके, पोलीस उप. निरी, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, मयुर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने व सागर मोरे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

