झोपडपट्टी परिसरामध्ये गांजा विक्रीवर 02 ठिकाणी छापा कारवाई, सुमारे 10 किलो गांजा जप्त महिलेसह 03 आरोपी ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा.पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले.
दि 04/12/2024 रोजी सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील काळाखडक परीसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार प्रदिप शेलार व गोविंद डोके यांना मिळालेल्या बातमीवरुन इसम नामे 1. सुरज पंडीत पवार वय 28 वर्षे रा. काळाखडक झोपडपटटी वाकड पुणे व 2. हफीजअली मेहबुबअली सय्यद वय 32 वर्षे रा काळाखडक झोपडपटटी वाकड पुणे यांस अ.क्र. 1 याचे घरामध्ये ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन एकुण 2,04,400/- किंमतीचा 3 किलो 722 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व 02 मोबाईल, रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे 1289/2024 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 20(ब)(त्त्)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि 05/12/2024 सपोनि सचिन कदम व पथक निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील सेक्टर 22 दत्त मंदिराचे परिसारात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रसाद कलाटे व गणेश करपे यांना एक महिला सार्वजनिक शौचालयाचे समोर आडोशाला रस्त्याचे कडेला संशयीतरीत्या थंाबलेली दिसली. ती महिला नामे मोहिनी आनंदा जाधव, वय अंदाजे 47 वर्षे, रा संग्रामनगर झोपडपट्टी, सेक्टर 22, ओटा स्किम, निगडी, पुणे हिचे ताब्यातुन एकुण 2,41,000/- रुपये किंमतीचा 4780 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व मोबाईल जप्त करुन तीचे विरुध्द निगडी पोलीस स्टेशन गु.र.क्र. 568/2024 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 20(ब)(त्त्)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा.संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 1, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2 यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, श्रेपोउपनि जिलाणी मोमीन पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, गोविंद डोके, प्रसाद कलाटे, गणेश करपे, राजेंद्र बांबळे, जावेद बागसिराज, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, विजय दौंडकर, अजित कुटे, रणधीर माने व चिंतामण सुपे यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

