ख्रिश्चन लीडर्स प्रेयर फेलोशिप पिंपरी चिंचवड द्वारे आयोजित ख्रिस्त जन्मोत्सव २०२४


पत्रकार सुनिल सांगळे व पिंपरी चिंचवड ब्युरो चिफ डॅनियल अँथोनी 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- गुरुवार दिनांक ०५.१२.२०२४ रोजी आचार्य अत्रे नाट्यगृह, संत तुकाराम नगर पिंपरी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला.पिंपरी चिंचवड मधील सर्व चर्चेस या कार्यक्रमात प्रत्यक्षरीतीने सहभागी झाले होते. या प्रसंगी विविध चर्चच्या युवक युवती व बालकांनी नृत्य व नाटक याद्वारे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उद्देश्य व संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवला.

गर्दीने तुडुंब भरलेल्या नाट्यगृहातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचा आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.

ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना जगिक झगमगाटापेक्षा आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो कसा साजरा करावा व यासंदर्भात पवित्र शास्त्र काय सांगते या आशयाचा उपदेश फेलोशिप चे अध्यक्ष पास्टर डॅनियल अँथनी यांनी यावेळी दिला.

 

या जन्मोत्सवाचे नियोजन ख्रिश्चन लीडर्स प्रेयर फेलोशिप पिंपरी चिंचवड च्या कोर कमिटी मधील पास्टर डॅनियल अँथनी , पास्टर प्रकाश नानिवडेकर, पास्टर वरप्रसाद मार्क, पास्टर फिलेमोन म्हात्रे , पास्टर सुनील सांगळे,पास्टर राजू माणिकम, पास्टर भास्कर साबळे, पास्टर अभिषेक शुक्ला यांनी यशस्वीरितीने केले. कोल्हापूरचे प्रसिद्ध निवेदक अतुल घाटगे यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीने या कार्यक्रमात रंगत भरली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पाळकवर्गाद्वारे नाताळगीते [कॅरल्स] गाण्यात आले.

त्याचप्रमाणे या विशेष प्रसंगी महा.पोलीस न्यूज व क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने ख्रिश्चन लिडर प्रेअर फेलोशिपचे पदाधिकारी यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.क्राईम असोसिएशनचे महाराष्ट्रा उपाध्यक्ष बालाजी शिंदे,पिंपरी चिंचवड पदाधिकारी अमोल कुंटे आणि कसबे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

या वेळी सर्व उपस्थितांनी एकमेकांना केक देऊन नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!