घरफोडी, मोबाईल चोरी गुन्हयातील आरोपीतास चोरीचे मोबाईल युनिट 6 पथकाने घेतले ताब्यात


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि.05/12/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक असे लोणीकाळभोर हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की घरफोडी, मोबाईल चोरी गुन्हयातील सराईत रेकॉर्डवरील आरोपी नामे गुलाम रजा ऊर्फ मसाट मजलुम सय्यद इराणी, वय 26 वर्षे, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता.हवेली, जि.पुणे

हा सदर राहते वस्तीत आला आहे. त्यावरून सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्यास कक्ष कार्यालयात आणून त्याचेकडे पथकाचे मदतीने कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याचा खालील गुन्हयांमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे.

1) वाघोली पो.स्टे. गु.र.नं. 1141/2024, भा.न्या.सं. कलम 303(2)

2) वाघोली पो.स्टे. गु.र.नं. 1142/2024, भा.न्या.सं. कलम 331(4), 305 (अ)

नमुद आरोपीताकडुन पंचनाम्या अंतर्गत 1,00,000/- रू. किमतीचे दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. त्यास पुढील तपासकामी जप्त मोबाईलसह वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री.निखिल पिंगळे, मा.सहा.पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो.हवा.रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, पो.ना. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!