रक्तचंदनाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन सुमारे नऊ कोटी रुपयांचे रक्तचंदनाचे लाकडाचे ओडके मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडुन जप्त
पत्रकार अमोल कुंटे पुणे जिल्हा
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त साो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड व श्री. डॉ. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ, यांनी अधिकारी व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अवैध धदंयावर व वाहतुकीवर छापा टाकुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे दिनांक ०२/०३/२०२५ रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे पिंपरी चिचवड आयुक्तलाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सपोफौ महेश खांडे व पोहवा १०७२ नितीन लोखंडे यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, पुणे मुबंई एक्सप्रेस वे वरती एमएच/४३/वाय/०७४२ या कंटेनर मध्ये अवैध रित्या मालाची वाहतुक होत आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक गोसावी, सपोफौ खांडे, पोहवा १०७२ लोखंडे, पोहवा १४५८ बनकर, पोहवा १७४५ गडदे, पोना १७२२ कोकणे, पोशि २८६५ कदम यांनी पुणे मुबंई एक्सप्रेस वे वरती शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणेच्या हद्दीत जुना ऊर्से टोलनाका जवळ जावुन सापळा रचुन शिताफिने एमएच/४३/वाय/०७४२ हा कंटेनर ताब्यात घेतला. त्यामध्ये १. राजाराम गंगाराम गायखे वय ३७ वर्षे रा. काळेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर २. हरप्रितसिंग धरमसिंग बदाना वय ४२ वर्षे रा. विराज रेसिडेन्सी वेस्ट ठाणे, हे इसम मिळुन आले. सदर इसमांना कंटेनर मधील मालाबाबत विचारणा केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यावर पंचनाम्या अंतर्गत सदर कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये ओलसर रक्तचंदनाचे लाकडांची ओडके मिळुन आले. त्याचे कडे रक्तचंदनाचे लाकडांची ऑडक्यान बाबत चौकशी केली असता त्याचे क्डे कोणतेही कागदपत्र बिल चलन नसल्याचे आढळुन आले. त्यावर सदर कटेनर ताब्यात घेवुन मोजमाप केले असता सदर कंटेनर मध्ये ११ टन ४९० किलोग्रॅम वजनाचे ८ कोटी ६१ लाख ७५ हजार किमंतीचे रक्तचंदनाचे लाकडांची ओडके मिळुन आले. त्यावर सदर रक्तचंदनाचे लाकडांची ओडके व ५० लाख रुपयांचा कंटेनर व ट्रेलर असा एकुण ९ कोटी ११ लाख ९१ हजार रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी विरुध्द शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणे गु. रजि. नं ५८/२०२५ अन्वये भा.न्या. सं कलम ३०३ (२), ३(५), भारतीय वन अधिनियम कलम २६, ४१, ४२ सह महाराष्ट्र खाजगी वृक्षतोड, अधिनियम १९६४, सुधारणा कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर इसमाना गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी कडे सदरचा माल कोठुन आणला, कोणाकडुन आणला तसेच ते कोणा कडे घेवुन जाणार आहे याबाबत अधिक तपास चालु आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. पिंपरी चिंचवड, मा. पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. श्री. वसंत परदेशी साो, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्री डॉ. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, पोहवा गडदे, पोना गणेश कोकणे, अमर कदम, हर्षद कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

