पौड पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! सुर्वेवाडी पौड येथील परमार बंगल्याचे परिसरात झालेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपीस केले जेरबंद…


प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी 
पौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- महापोलीस न्यूज ऑनलाईन पुणेपौड पोलीस स्टेशन गु.र.नं. २७९/२०२५ भा.न्या.सं.क १०३(१) प्रमाणे दि. २४/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे, सदर गुन्हयातील मयत युवक नामे सागर भाऊराव मेश्राम वय ३० वर्षे सध्या रा. परमार बंगला, रेवती देसाई यांचे गोठयावर, सुर्वेवाडी फाटा, पोड ता. मुळशी जि.पुणे, मुळ रा. बाई ता. वाई जि. सातारा हा यातील फिर्यादी नामे रेवती योगेश देसाई रा. परमार बंगला, मिस्टेक व्हिलेज, सुर्वेवाडी फाटा पौड, ता. मुळशी जि.पुणे यांचेकडे दोन वर्षा पासुन गुरे सांभळण्याचे काम करत होता, दि. २४/१०/२०२५ रोजी पहाटे ०२.३० वा सुतास परमार बंगल्याजवळ फिर्यादी यांचे गोठ्याबाहेर सागर मेश्राम हा जखमी अवस्थेत मिळून आला. त्याचे डोक्यास गंभीर जखमा झाल्या होत्या व मोठ्या प्रमाणात रक्त पडले होते. सागर मेश्राम वाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून कशानेतरी डोक्यात मारून गंभीर जखमी केले व जिवे ठार मारून खून केला असलेबावत फिर्यादी यांनी फिर्याद नोंदविल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.
सदर घटना ही गंभीर स्वरूपाची असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक साो पुणे विभाग यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेवन् स्थानिक गुन्हे शाखा व पौड पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांची चार पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. मा. पोलीस अधीक्षक सो यांचे आदेशानुसार तपास पथकांनी तपास सुरू केला, फिर्यादी या हिंदू राष्ट्र सेना या संघटनेचे काम पाहत आहेत, त्यामुळे त्यांचकडे त्यांचे समर्थक, संघटनेचे कार्यकर्त येतात, गोठयावर गुरांची देखभाल व सेवा करतात. त्यामुळे गोठयावर नेहमी कार्यकर्ते असतात, अशी माहिती मिळाली. सागर मेश्राम हा गोठ्यावर असताना त्याचे सोबत इतर पाच ते सहा कार्यकर्ते उपस्थित होते, परंतु त्यापैकी दोन कार्यकर्ते हे कोणासही काही एक न सांगता निघून गेले होते, ते गोठयावरून केव्हा निघून गेले याबाबत कोणासही काही एक सांगता येत नव्हते. त्यामुळे त्या दोघांवर गुन्हयाचे अनुषंगाने संशय बळावला होता.
तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी संशयित कार्यकर्ते यांची नावे १) कुमार लालु राठोड ऊर्फ कुमार अरुण राठोड यय २१ वर्षे रा. आगरखेड ता.इंडी जि.विजापुर राज्य कनार्टक २) शिवशरण आप्पा ऊर्फ काली बसवराज शटकर रा. गादगी बीदर राज्य-कर्नाटक अशी असल्याची माहिती प्राप्त केली आणि त्यांचा शोध सुरू केला. संशयित आरोपी हे डोंबीवली येथे गेले असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. तपास पथकाने वरीष्ठांचे परवानगीने डोंबीवली येथे जावून बातमीदाराचे मदतीने वरील संशयितांना ताब्यात घेतले, त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले.
आरोपीना विश्वासात घेवून चौकशी केली असता, मयत सागर मेश्राम व दोन्ही आरोपी यांचेत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, सागर मेश्राम हा दारू पिऊन गोठयावर येत असे आणि आरोपींना विनाकारण शिवीगाळ दमदाटी करत असे. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी दि. २४/१०/२०२५ रोजी सागर मेश्राम याचे सोबत भांडत सुरू असताना डोक्यात वीट, दगड मारून त्याचा खून केला आहे. असे सांगितले. तसेच गुन्हा केलेनंतर दोन्ही आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले होते, त्यांनी पळून जाताना दारवली परिसरातून स्लेंडर मोटार सायकल नं. एम.एच. १२ आर.एल. ५७८५ ही चोरी केली आणि पळून गेले असल्याचे सांगितले. आरोपीचे ताब्यातून स्प्लेंडर मोटार सायकल नं. एम.एच. १२ आर.एल. ५७८५ ही जप्त करणेत आलेली असून त्याबाबत पौड पो स्टे गु.रनं. २८०/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे.
आरोपी नामे १) कुमार लालु राठोड ऊर्फ कुमार अरुण राठोड वय २१ वर्षे रा. आगरखेड ता. इंडी जि. विजापुर राज्य- कनार्टक २) शिवशरण आप्पा ऊर्फ काली बसवराज शटकर रा. गादगी बीदर राज्य कर्नाटक सध्या दोघे रा. परमार बंगला, सुर्वेवाडी फाटा, रेवती देसाई यांचे गोठयावर पौड ता. मुळशी जि. पुणे यांना मा. न्यायालयात उपस्थित करणेत आले होते, त्यांची दि. ०४/११/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिलकुमार पुजारी, हवेली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पौड पो स्टे चे पो नि संतोष गिरीगोसावी, स्था. गु.शा. चे सपोनि दत्ताजीराव मोहिते, पौड पोलीस स्टेशनकडील सपोनि बालाजी कांबळे, सुधीर कदम, श्रेणी पोसई नाना शेंडगे स्था.गु.शा. कडील श्रेणी पोसई हनुमंत पासलकर, स्था.गु.शा.चे अंमलदार तुषार भोईटे, सागर नामदास, अमोल शेडगे, मंगेश भगत, राजु मोमीण, अतुल डेरे, रामदास बाबर, वैभव सावंत, भारत मोहोळ, समीर तांगडे, पौड, पो.स्टे. अंमलदार समीर शेख, रॉकी देवकाते, सिध्देश पाटील, ईश्वर काळे, संतोष दावलकर, चंदु सोनवणे, गणेश पवार, सचिन सलगर, गौतम लोकरे, महेश पवार, हनुमंत शेंडगे यांनी केली असून पुढील तपास पौड पोलीस स्टेशन करत आहेत.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!