गुन्हे शाखा युनिट 3 ची कौतुकास्पद कामगीरी !३ मोटर सायकल जप्त 3 गुन्हे उघड  


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा युनिट 3 कडील पोहवा/479 सानप, पोशि/2877 मेरगळ, पोशि/1281 कोळेकर, पोशि/2296 जैनक, पोशि/2883 काळे असे दिघी पोलीस ठाणे हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोशि/1281 कोळेकर व पोशि/2877 मेरगळ यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे भरत तिवारी मोरे वय 23 वर्षे रा. मु.पो.मोरेवाडी ता. आंबेजोगाई जि.बिड हा चोरीतील मोटर सायकल विक्री करीता खडी मशिन रोड दिघी येथे येणार आहे असले बाबत खात्रीशीर माहीती मिळाली असता वरील नमुद पथकाने मोटर सायकल सह आरोपी नामे भरत तिवारी मोरे वय 23 वर्षे रा. मु.पो.मोरेवाडी ता. आंबेजोगाई जि.बिड यास सीआरपीसी 41 (1)(ड) प्रमाणे ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने दिघी, आळंदी हददीत गुन्हे केल्याची कबुली देवून त्याचेकडून 03 मोटर सायकली असा एकुण 1,10,000 /- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करुन खालील प्रमाणे 03 गुन्हे उघडकीस आणले आहेत

Advertisement

1) दिघी गु.र.नं. 6/2024 भा.दं.वि.कलम 379

2) दिघी गु.र.नं. 378/2023 भा.दं.वि.कलम 379

3) आळंदी गु.र.नं. 08/2024 भा.दं.वि.कलम 379

सदर आरोपीस वैदयकीय तपासणी करुन दिघी पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे. आरोपी वर यापूर्वी दाखल असणारे गुन्हे खालील प्रमाणे

1) आंबेजोगाई पोलीस स्टेशन बिड गु र नं 165/2021 ipc 324,323,504

2) आंबेजोगाई पोलीस स्टेशन बिड गु र नं 09/2020 Arm act 4(25)

3) आंबेजोगाई पोलीस स्टेशन बिड गु र नं 211/2022 ipc 324,323, 506

4) आंबेजोगाई पोलीस स्टेशन बिड गु र नं 335/2021 ipc posco with 376, 354,323,

सदर कामगिरी गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड साहेब पोलिस हवलादार – विठल सानप, पोलिस अमलदार – योगेश्वर कोळेकर,रामदास मेरगळ, समीर काळे ,सागर जैनक, महेश भालचीम, सचिन मोरे . त्रिनयन बालसराफ यांनी केली आहे…


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!