ऑनलाईन गेमींग चा आयडी देण्याचा बहाणा करून फसवणूक करत सोन्याचे दागिन्याची खंडणी घेणारी टोळी केली जेरबंद


विशाल धाकतोडे पुणे  प्रतिनिधी
शिक्रापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण 
महा पोलीस न्युज ! ऑनलाईन पुणे :- शिक्रापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७०३/२०२५ भा.न्या.सं.क ३१८(४), ९५, ३०८(५), ४९, ३५१ (२) (३), ३(५) व बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधि. २०१५ चे कलम ७६ प्रमाणे दि. १५/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे, कोरेगाव भिमा ता. शिरूर जि पुणे येथील अल्पवयीन मुलाने शाळेतील ऑनलाईन अभ्यास करताना मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्यास सुरूवात केली. ऑनलाईन गेम खेळण्याचा छंद लागल्याने ” फ्रि फायर ” नावाचा गेम खेळण्यासाठी आयडी मिळविण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवरून आरोपो मयुर भिसाड रा. परभणी याने ऑनलाईन गेमीग आय डी देतो असा बहाणा करून दि. १०/१०/२०२५ रोजी १०/०० वा सुवास अल्पवयीन मुलाकडून ५ तोळे वजनाचे ३,५०,०००/- रू. किंमतीचे सोन्याचे दागिने घेतले, परंतु ऑनलाईन आय डी सुरू होवून पुढे सुरू राहीला नाही., त्यानंतर आय डी पाहिजे असेल तर सोन्याचे दागिने व ५०,०००/- रू. खंडणी मागितलो म्हणून अल्पवयीन मुलाचे वडील दत्तात्रय शांताराम ढेरंगे, वय ४० वर्षे, रा. ढेरंगे वस्ती, कोरेगाव भिमा, ता. शिरूर जि.पुणे यांनी वरील प्रमाणे फिर्याद नॉर्दावली आहे.
ऑनलाईन गेमींगचे माध्यमातून आरोपोंनी अल्पवयीन मुलास लक्ष केले आणि फसवणूक करून खंडणी मागितल्याचा प्रकार हा सामाजिक दृष्टया गांभीर्याचा असल्याने सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक साो. पुणे ग्रामीण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले, शिरूर उपविभाग यांचे नेतृत्वाखाली करणेस सांगितले व विशेष तपास पथक तयार करणेत आले. तपास पथकाकडून सदर गुन्हयाचा तपास सुरू करणेत आला असता, आरोपीचे व पिडीत मुलाचे मोबाईल, सोशीअल मिडीयावरील चॅटींग, डिजीटल व्यवहारांचा सखोल तपास करून तांत्रिक विश्लेषण करणेत आले, तपासातील प्राप्त माहितीचे आधारे आरोपी १) मयूर ऊर्फ शशिकांत मुंजाजी भिसाड वय २१ वर्षे, रा. गव्हाणे चौक परभणी, ता. जि. परभणी, यास दि. १५/१०/२०२५ रोजी अटक करणेत आली, त्याचेकडे सखोल तपास केला असता, त्याने फसवणूक करून अपहार केलेले सोन्याचे दागिने हे आरोपी २) श्री किशोर डहाळे, वय २२ वर्षे रा. परभणी ता. जि. परभणी यास विक्री केले असल्याचे सांगितले तसेच श्री किशोर डहाळे याने अल्पवयीन मुलाकडून सोन्याचे दागिने घेवून ये, ते मी विकत घेतो अशी अपप्रेरणा देवून गुन्हा करणेस प्रवृत्त केले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी श्री किशोर डहाळे यास देखील गुन्हयाचे तपासकामी दि. १९/१०/२०२५ रोजी ताब्यात घेवून अटक करणेत आली आहे.
दोन्ही आरोपींना अटक करणेत आले असून त्यांचेकडून गुन्हयातील अपहार करणेत आलेल्या मुद्देमालापैकी २३ ग्रॅम वजनाचे एकूण १,६२,८२०/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करणेत आले आहेत. दोन्ही आरोपींची मा. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केली असून दोन्ही आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
पालकांनी मुलांना ऑनलाईन अभ्यासाकरीता मोबाईल दिल्यानंतर देखील मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होत आहे अगर कसे किंवा अनावश्यक वेबसाईट पाहतात अगर कसे? याबाबत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असून त्याबाबत नागरीकांनी जागरूक रहावे असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण यांनी केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, यांचे सुचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले, साो. शिरूर उप विभाग, शिक्रापूर पो स्टे चे पो.नि. दिपरतन गायकवाड, सपोनि राहूल देशमुख, अंमलदार विनायक मोहिते, प्रताप कांबळे यांनी केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले शिरूर उप विभाग हे करत आहेत.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!