सराईत ०३ आरोपीकडून एकुण ०४ गावठी पिस्टल व ०५ जिवंत काडतूसे जप्त


इमरान शेख पुणे प्रतिनिधी
काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर
  • महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-  काळेपडळ पोलीस स्टेशनचे हद्दीत तपास पथकाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार शाहीद शेख, दाऊद सय्यद यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामे आसिफ सबीरखा तेली, हा हेवनपार्क व लक्ष्मीपार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता, पालखी रोड मार्ग, महंमदवाडी, पुणे येथे त्याच्या दोन साथीदारांसह थांबलेला असून कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्देशाने काहीतरी संशयित वस्तु जवळ बाळगुन वावरत असुन संशयित वस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे. अशी बातमी मिळाली.
सदरबाबत पोलीस उप निरीक्षक गुरव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. मानसिंग पाटील यांना कळविले असता, त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरी. विनायक गुरव व पोलीस स्टाफ असे हेवनपार्क व लक्ष्मीपार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता, पालखी रोड मार्ग, महंदवाडी, पुणे येथे सर्व टिमला दिलेल्यां सुचनांप्रमाणे जावुन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे आसिफ सवीरखा तेली वय २१ वर्षे, रा. गल्ली नं.१५, सय्यदनगर, हडपसर, पुणे व त्याचे दोन साथीदार नामे यश सुभाष मदने, वय २० वर्षे, रा. मीमरत्ननगर, कसबा, बारामती, पुणे, प्रथमेश संदीप लोंढे, वय २४ वर्षे, रा. वडगाव निंबाळकर, निरा रोड, बारामती, पुणे हे संशयितरित्या आढळून आलेने त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ०४ पिस्टल व ०५ जिवंत राऊंड असा एकुण २,४२,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. तरी नमूद इसम आसिफ सबीरखा तेली, यश सुभाष मदने, प्रथमेश संदीप लोंढे यांच्यावर भा.न्या.सं. कलम ३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीतास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५. पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री.धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, संजय बागल, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांचे पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!