शाळा कॉलेज परिसरातील मुलींना छेडणारे रोड रोमियो यांचेवर दामिनी कोथरूड मार्शल यांच्या सतर्कतेमुळे योग्य ती कारवाई करण्यात आली
आसमा सय्यद पुणे प्रतिनिधी
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 01/10/2025* रोजी दामिनी कोथरूड मार्शल महिला पोलीस शिपाई *9396 श्रुती वैभव कढणे* यांना कॉलर अनिल खराडे राहणार किषकिंदा नगर कोथरूड पुणे यांनी फोनवरून कळविले की माझी मुलगी अंजली अनिल खराडे वय 17 वर्ष राहणार सदर ही काल दिनांक 30/09/2025 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेज येथे गेली असता *भारती विद्यापीठ कॉलेजच्या बाहेर काही मुलांनी पाठलाग केला त्याबाबत आम्ही शास्त्रीनगर पोलीस चौकी तक्रार केली आहे मुलांना योग्य ती समज देण्यात आलेली आहे,माझी मुलगी खूप घाबरलेली असून मॅडम आपण प्लीज मुलीसोबत बोला असे सांगितल्याने आम्ही तात्काळ मोरे विद्यालय येथे भेट दिली.
सदर ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक सर यांच्याशी संवाद साधला व यांचे समक्ष इयत्ता 12 वी क्लास येथे शिकणारी अंजली खराडे व संजीवनी मेने यांच्याशी संवाद साधला त्यांना दामिनी पथक यांच्या कामकाजाबाबत माहिती देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या मुलींनी सांगितले की कॉलेज सुटल्यानंतर आम्ही कर्वे रोड येथे डी मार्ट येथे गेलो असता काही मुले पाठलाग करत तिथे येऊन आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती आम्ही त्यांचेशी न बोलता तिथून घरी निघून आलो असे सांगितल्याने आम्ही सदर मुलांचे मोबाईल क्रमांक वर संपर्क केला असता मुलांचे मोबाईल क्रमांक बंद मिळून आले त्यानंतर सदरचा प्रकार कर्वे रोड येथे झाल्याने मुलींना तक्रार असल्यास कर्वेनगर येथे जाऊन तक्रार देण्याबाबत सांगितले चौकी येथे मुलींसमक्ष मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या समोर इथून पुढे नीट वागणे बाबत योग्य ती समज देण्यात आलेली आहे, दोन्ही मुलांनी इथून पुढे आम्ही मुलींना त्रास देणार नाही व आमचे चुकले असे बोलून मुलींची माफी मागितले आहे
दोन्ही मुलींना येथून पुढे घाबरण्याची काही गरज नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत कधी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आमचा पर्सनल* मोबाईल नंबर व पोलीस हेल्पलाइन नंबर 112 / 1091वर कधीही संपर्क करू शकता याबाबत माहिती* दिली.
सदर मुलींचे नातेवाईक व मुलींनी दामिनी पथक आपल्या नियमित भेटीमुळे आम्हाला खूप मदत होते असे बोलून दामिनी कोथरूड मार्शल यांच्या कामकाजाबाबत कौतुक केले आहे. दामिनी पथकामुळे मुली व महिलांना आपण सुरक्षित आहोत असे जेव्हा वाटते तेव्हा आपण काम जे काम करतो त्याचा आपल्या स्वतःला अभिमान वाटतो

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

