बंडगार्डन पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी ! चैन स्नॅचिंग करणा-या विधीसंघर्षीत बालकांकडुन एकुण २,५०,०००/-रुपये किंमतीचे सोने केले हस्तगत


पंकेश  जाधव मुख्य संपादक 7020794626
बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर
महापोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-  फिर्यादी महिला नामे अंजनी शाम अमोलीक वय ५८ वर्षे धंदा नोकरी रा. ओंकार अपार्टमेन्ट फ्लॅट नं.१६, सहयाद्रीनगर, धनकवडी, पुणे या दिनांक २९/०७/२०२५ रोजी सकाळी पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म नं.६ पासुन ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेज कडे पायी जात असताना दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या गळयातील मिनीमंगळसुत्र हिसका मारुन जबरीने चोरुन नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २३१/२०२५ भा. न्याय संहिता कलम ३०४ (२), ३ (५) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नमुद गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणण्याचे दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, बंडगार्डन पोस्टे यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना मार्गदर्शन केले होते.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना ५५ सीसीीव्हि कॅमेरे चेक केले असता सारस साळवी व प्रकाश आव्हाड यांना सदरचे आरोपी मु.पोस्ट नडशी ता. कराड जि. सातारा या भागातील असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने त्यांना राहते घरातुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करता ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन पुणे स्टेशन परिसरात चो-या केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले सोन्याचे गंठण ज्या ठिकाणी गहाण ठेवले होते त्याठिकाणाहून गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २३१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३ (५) व गु.र.नं. ३७०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) असे दोन गुन्हे उघडकिस आणुन दोन लाख रुपयाचे सोन्याचे गंठण व ५०,०००/- रु कि. होंडा अॅक्टीव्हा असा एकुण २,५०,०००/- रु कि. मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सोो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सोो, पोलीस सह. आयुक्त, मा. राजेंद्र बनसोडे सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मा. श्री. मिलिंद मोहिते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. मा. श्रीमती संगिता आल्फोन्सो शिंदे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, मोहन काळे, पो.अं. प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, यांचे पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!