गुन्हे शाखा, युनिट-३ ची उल्लेखनिय कामगिरी ! घरफोडी करुन परराज्यात धुम स्टाईलने फरार होणारे अट्टल चोरांना ४८ तासाच्या आत केले अटक…


बालाजी शिंदे ब्युरो चीफ पुणे जिल्हा
गुन्हे शाखा, युनिट-३ पिंपरी चिंचवड शहर 
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- घरफोडी करुन परराज्यात धुम स्टाईलने फरार होणारे अट्टल चोरांना जेरबंद करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी चिंचवड कडील पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे तसेच पोउपनि भरत गोसावी, पो.उपनि सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बो-हाडे, सागर सुर्यवंशी, श्रीधन इचके, संदिप सोनवणे, मनोज साबळे, रुषीकेस मोसुरे, अजित रुपनवर, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, समिर काळे, सुधिर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, निखील फापाळे, प्रदीप राळे, राजकुमार इधारे असे पथक तयार करुन चाकण पोलीस स्टेशन हददीत इंद्रायणी हॉटेलच्या समोर, पुणे नाशिक हायवे लगत, वाकी चाकण येथे सापळा लावुन थाबले असता एक पांढ-या रंगाच्या टाटा टॅम्पोमध्ये पाठीमागे एक विना नंबरची दुचाकी गाडी व समोर कॅबिनमध्ये तीन इसम संशयीत्तरित्या बसल्याचे दिसुन आले. सदर टॅम्पो जवळ पथक जात असतांना आत मध्ये बसलेल्या इसमांना संशय आल्याने त्यांनी लागलीच पळून जाण्याचा प्रयत्न केला असता गुन्हे शाखा युनिट ३ कडील अधिकारी व स्टाफ यांनी मोठ्या शिताफीने बळाचा वापर करुन संशयित इसम नागे १) मोसीन शौकतअली शेख वय ३२ वर्षे रा. लोहियानगर सत्यकम, स्कुल जवळ, एम ब्लॉक, मेरठ उत्तर प्रदेश २) उदयवीर मलखानसिंग सहासी वय ३६ वर्षे रा. गल्ली नं ३ प्रतापनगर, जयभिम नगर, मेरठ उत्तर प्रदेश ३) विनय कुमार गंगासरन वय ३४ वर्षे रा. ग्राम बिजोली ठाणा, खरखोदा, मेरठ, उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे असलेल्या बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहीत्य, टेम्पो मध्ये विना नंबरची दुचाकी व वरिल नमुद इसमाच्या जवळ सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळुन आले. मिळुन आलेल्या सोनेचांदीचे दागिने व रकमेबाबत सदर इसमाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही मेरठ, उत्तर प्रदेश येथुन एका चारचाकी वाहनात दुचाकी टाकुन पिंपरी चिंचवड शहरात वाहन पार्क करुन दुचाकीने घरफोडी करुन परत १०० ते १५० किलोमिटर पोलीसांना समजु नये व थांगपत्ता लागु म्हणुन दुचाकीवर जातो व त्यानंतर निर्जनस्थळी दुचाकी ही टेम्पो मध्ये टाकुन मेरठ, उत्तर प्रदेश येथे निघुन जातो असे सांगीतले.
सदर आरोपी कडुन गुन्ह्यात वापरलेले टाटा कंपनीचा पांढ-या रंगाचा टॅम्पो यु.पी १५ जेटी २५९२. एक होन्डा कंपणीची शाईन दुचाकी, एक मोबाईल फोन, इतर साहीत्य तसेच सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण १२,१३,५९८/- रु किंमतीचे जसेच्या तसे व १३,००,०००/- रुपये किंमतीचे नवीन एक टेम्पो व दुचाकी ४८ तासाच्या आत जप्त करुन १) विधी गुन्हा रजि. नं.६३३/२०२५ भारतीय न्याय सहीता
कलम ३०५ (अ), ३३१ (३).३ (५) २) चाकण गुन्हा रजि. नं. १०९०/२०२५ भारतीय न्याय सहीता कलम ३०५ (अ),३३५ (३). ३) काळेवाडी गुन्हा रजि. नं. ५८०/२०२५ भारतीय न्याय सहीता कलम ३०५ (अ).३३१ (३). ४) सांगवी गुन्हा रजि. नं.५८८/२०२५ भारतीय न्याय सहीता कलम ३०५ (अ), ३३१ (३) असे एकाच दिवशी केलेल्या घरफोडीचे ठिकाणे आरोपीने दाखवुन ०४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत व या पुर्वी केलेल्या घरफोडीची माहीती घेवुन अधिक तपास पोउपनि सुनिल जावळे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो, मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर सो, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड सो., मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री डॉ. शिवाजी पवार सो, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. डॉ. विशाल हिरे, यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली व सुचनाप्रमाणे श्री. संतोष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ यांचे नेतृत्वात पोउपनि भरत गोसावी, पो. उपनि सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सुर्यवंशी, श्रीधन इचके, संदिप सोनवणे, मनोज साबळे, रुषीकेश भोसुरे, अजित रुपनवर, स्वप्निल महाले, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, समिर काळे, सुधिर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, राजकुमार इधारे, निखील फापाळे, प्रदीप राळे, तांत्रिक विश्लेषक प्रकाश ननावरे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!