कल्याण जिल्हा कारागृह येथे ई-मुलाखत, ई-ग्रंथालय, स्मार्टकार्ड फोन सुविधा व कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा सी.सी.टी.व्ही. प्रकल्पांचा उद्घाटन समारंभ श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडला
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक 12.03.2023 रोजी मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे- 1 यांचे हस्ते कल्याण जिल्हा कारागृह येथे ई-मुलाखत, ई-ग्रंथालय, स्मार्टकार्ड फोन सुविधा व कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा सी.सी.टी.व्ही. प्रकल्पांचा उद्घाटन समारंभ पार पडला. सदर समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा, मुंबई-४ व श्री. आर. आर. भोसले, अधीक्षक, कल्याण जिल्हा कारागृह आणि इतर अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
बंद्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या ई-ग्रंथालय सुविधेसाठी 05 नवीन संगणकांवर ई-ग्रंथालयाच्या विविध वेबसाईट सुरु करुन त्यामध्ये 3 ते 4 हजार पुस्तके ऑनलाईनरीत्या बंद्यांच्या वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बंद्यांच्या ई-मुलाखतसाठी उच्च प्रतीचे 05 नवीन संगणक वेब कॅमेरा व हेडफोन सह कार्यान्वित करण्यात आले असून ई-मुलाखत प्रक्रियेद्वारे बंद्यांच्या नातेवाईकांना घरबसल्या तसेच देशभरातून कोणत्याही ठिकाणाहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारागृहात दाखल बंद्याची मुलाखत घेणे शक्य होणार आहे. स्मार्टकार्ड फोन सुविधेसाठी कारागृहात सर्व सर्कल व विभागांमध्ये 16 स्मार्टकार्ड फोन बसविण्यात आले असून त्याद्वारे प्रत्येक आठवड्यातुन तीन वेळा (एकूण 18 मिनिटे) बंद्यांना आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधता येणार आहे. कारागृह सुरक्षेसाठी आर्टीफिशियल इंटेलिजेंस सारखे उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेले 270 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे देखील कारागृहात बसविण्यात आलेले आहेत. एकंदरीत जलद गतीने बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर वाढत चाललेले आधुनिकीकरणाची बाब कारागृह प्रशासनाने देखील आत्मसात करुन मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे -1 व कारागृहाचे अधिकारी / कर्मचारी यांचे संयुक्त विद्यमाने कारागृह सुरक्षितते बरोबर कारागृहाचे आधुनिकीकरण करुन कारागृहात विविध नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

