घरगुती सिलिंडरमधून गॅस चोरी करून व्यावसायिक वापर करणारी टोळी गजाआड…
संपादक :- पंकेश जाधव 7020794626
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस पाईपच्या साह्याने काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणाऱ्या चौघांच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार सर्फराज नुरखान देशमुख (वय ३९, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली. गणेश दिलीप भोईटे (वय २७), सुनील पंडित आकळे (वय ३५), निरंजन अंकुश आकळे (वय ३५), देविदास शंकर आकळे (सध्या सर्व रा. पावसरेनगर, येवलेवाडी, कोंढवा) असे आरोपींचे नाव आहे.
आग लागण्याच्या घटना
काही जण शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा करतात. घरगुती तसेच व्यवसायिक वापराचे सिलिंडर जादा दराने विक्री करत असून, पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला आहे. यापूर्वी शहरात बेकायदा सिलिंडर साठवणूक करण्यात आलेल्या गोदामांना आग लागल्याची घटना घडल्या आहेत.
विक्री करण्यात येतो. मोठा धोका पत्करून शहरातील काही भागांत हे प्रकार सर्रास सुरू आहेत. कोंढवा भागात पत्राच्या शेडमध्ये
शहरात अनेक ठिकाणी काळाबाजारात विक्रीसाठी धोकादायक पद्धतीने गॅस सिलिंडरचा साठा करण्यात येतो. त्यातूनच मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून विक्री करण्यात येतो. मोठा धोका पत्करून शहरातील काही भागांत हे प्रकार सर्रास सुरू आहेत. कोंढवा भागात पत्राच्या शेडमध्ये
अवैध पद्धतीने घरघुती गॅस सिलिंडरमधील गॅस इतर सिलिंडरमध्ये टाकण्यात येत होता. याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्या सूचनेनुसार कोंढवा पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसरेनगर, येवलेवाडी कोंढवा येथे एका पत्राच्या शेडमध्ये अवैध पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस लोखंडी पाईपच्या साहाय्याने काढून १९ किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडर आणि घरगुती वापराच्या ४ किलो गॅस सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने छापा टाकून ८ लाख ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक थोरात करत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

