मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी !रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडुन खुनाचा प्रयत्न ०४ आरोपीतांना केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक. 7020794626

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- फिर्यादी यास कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले असल्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७/२०२४ भा.द.वि.कलम ३०७,३२३,५०४,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) व मु.पो.अ.कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे हद्दीत व परहद्दीत आरोपीतांचा शोध घेवुन दाखल गुन्हयात ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकातील सपोनि कांबळे, व स्टाफ असे आहोरात्र प्रयत्न करुन बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करुन घेत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १) ऋतिक संजय मोहोळ, वय २३ वर्षे, रा. बिल्डींग नं.१, रुम नं.९, हमालनगर मार्केटयार्ड पुणे २) ओम प्रताप पवार, वय २३ वर्षे, रा. बिल्डींग नं.९, रुम नं.२४, हमालनगर मार्केटयार्ड पुणे ३) नयन भाऊसाहेब मोहोळ, वय ३४ वर्षे, रा. बिल्डींग बी १ फ्लॅट नं.१०, गणेश मार्केट मार्केटयार्ड पुणे ४) निखील मुकुंद बाबर, वय २८ वर्षे, रा. बिल्डींग नं.३, रुम नं.१५. हमालनगर सोसायटी मार्केटयार्ड पुणे यांनी गंगाधाम फेज २ मार्केटयार्ड पुणे यांना तात्काळ अटक केले असुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास मार्केटयार्ड पो.स्टे पुणे सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे करीत आहे.

Advertisement

सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे श्री. आर. राजा, मा. सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार राजेश थोरात, अशोक हिरवाळे, किरण जाधव, कौस्तुभ जाधव, आशिष यादव, मोहन झायटे यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!