रेकॉर्डवरील दोन तडीपार आरोपी हत्यारा सह मिळून आल्याने केले जेरबंद तसेच एका सराईत गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस केले जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

सिंहगडरोड पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरातील पोलीस स्टेशन हाद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी तसेच तडीपार आरोपी यांना वेळोवेळी चेक करुन लक्ष ठेवणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुशगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दि.०५/०२/२०२४ रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हादीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड पो स्टे पुणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पोलीस स्टेशन याचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार, शिवाजी क्षीरसागर व स्वप्निल मगर यांना त्याचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, खडक चौक मारुती मंदीराजवळ धायरी पुणे येथे एक इसम हातामध्ये पिस्टल घेवुन उभा आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांना कळविली असता, वरिष्ठांनी योग्यती पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.

सदर मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करता सदर ठिकाणी पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे अश्विन ऊर्फ बारक्या बाळकृष्ण लोणारे, वय-१९ वर्षे, रा.लोणारे वस्ती, तीन मजली ईमारत, खडक चौक, धायरी, पुणे हा हातामध्ये पिस्टल घेवुन उभा असल्याचे दिसल्याने त्यास आमची येण्याची चाहुल लागु न देता त्यास शिताफीने पकडून त्याचे जवळील एक पिस्टल ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेता त्याचे पॅन्टचे डावे खिशात एक जीवंत काडतुस असा ४५,५००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

Advertisement

तसेच दि.०४/०२/२०२४ रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हाद्दीमध्ये तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे रेकॉर्ड वरील आरोपी चेक करीत असताना सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील तडीपार आरोपी नामे दिनेश लक्ष्मण ढवळे वय-२७ वर्षे रा. साईनगर खोराडवस्ती पाण्याचे टाकीजवळ हिंगणे खुर्द पुणे सध्या रा. सिध्दार्थ कॉम्पलेक्स फ्लॅट नं.१ अपुर्वा मेडीकल समोर जाणता राजा चौकाजवळ आनंदनगर सिंहगडरोड पुणे हा मिळुन आल्याने त्याचे विरुध्द सिहंगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.७०/२०२४ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

तसेच दि.०१/०२/२०२४ रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हाद्दीत पोलीस रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना रायकर वॉटर सप्लाय, मुरली व्हेज हॉटेल पासुन आतमध्ये, धायरी पुणे. येथे सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील तडीपार आरोपी नामे फैजल उर्फ सायको अफजल हुसेन, वय २३ वर्षे रा. यमुनाताई नगर चाळ, समृध्दी हॉटेलच्या मागे धायरी, पुणे हा मिळुन आल्याने त्याचे विरुध्द सिहंगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.६५/२०२४ आर्म अॅक्ट कलम ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७(१) सह १३५ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच मागील आठ दिवसात पोलीस ठाणे हद्दीतील दोन तडीपार इसम व अग्नीशस्त्र जवळ बाळगलेला रेकॉर्ड वरील व सराईत आरोपी यांना अटक केली असुन नमुद गुन्ह्यांचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ३. पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर, श्री. आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. श्री. जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेंगरे, स्वप्निल मगर, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे विकासरा बांदल, अमोल पाटील यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!