अवैद्य अग्नीशस्त्र व एक जिवंत राऊंड बाळगणा-या सराईत आरोपीस केले जेरबंद


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०७/०२/२०२४ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलीस अंमलदार, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी राधेमोहन (मुन्ना) सिताराम पिसे, वय २० वर्षे, रा. प्रेमा कॉलनी, लेन नं.०२, यशोदिप चौक, वारजे माळवाडी, पुणे हा भुमकर चौकाकडून स्वामी नारायण मंदीराकडे जाणा-याकडे रोडवर कमरेला पिस्टल लावुन थांबला आहे अशी बातमी मिळाली.

Advertisement

त्या अनुशंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपारा पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी स्वामीनारायण मंदीराचे जवळ जावुन सदर आरोपीचा शोध घेतला असता नमुद आरोपी याचे ताब्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व २००/- रुपये किंचे १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,२००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल जप्त करुन, त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १२६/२०२४, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्रीमती, रमार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुण, श्रीमती. नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.डी.एस. पाटील, पोलीस उपनिरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!