गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी ! गांजा विक्री करणा-या गुन्हेगारांस केले जेरबंद



पंकेश जाधव संपादक 7020794626

 युनिट-६ गुन्हे शाखा पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.३१/०१/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिटचे कार्यक्षेत्रात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करित असताना आव्हाळवाडी फाटा, वाघोली येथे आले. आव्हाळवाडी फाटा येथुन पायी पेट्रोलिंग करत असताना, वाघोली बाजार तळ भिंती जवळ गेलो असता सदर ठिकाणी दोन इसम संशयीत रित्या एक बॅग हातामध्ये घेऊन त्यांचेकडील मोटार सायकल जवळ उभे असलेले दिसले पोलीस पथकास बघुन ते त्यांचेकडील दुचाकी गाडी वरुन निघुन जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने व त्यांचे हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या इसमांजवळ व त्यांच्याकडील बॅगेमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे संशय आल्याने, सदर विकाणावरुन लोणीकंद पो.स्टे. कडील पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करित जात असताना निदर्शनास आल्याने, त्यांना बोलावुन घेवुन, युनिट कडील पोलीस पथक व लोणीकंद पो.स्टे कडील पोलीस स्टाफ च्या मदतीने त्यांना त्यांचे ताब्यातील वाहन व बॅगेसह पळून जात असताना जागीच शिताफिने पकडले.

त्यानंतर नमुद इसमांस त्यांचे नाव पत्ता विचारला ते उडवाउडवीचे उत्तर देवु लागले. पोलीस पथकाने त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी त्यांचे नाव १) निखिल यशवंत नवले वय २४ वर्षे, रा. रेल्वे स्टेशन विसापुर ता. श्रींगोदा जि.अहमदनगर २) आदित्य विलास देशमुख वय १९ वर्षे रा, हांडेबाई वौक, विसापुर ता. श्रीगोदा जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातील बेंगेमध्ये व त्यांचेजवळ काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आल्याने, ताब्यातील बँगेस हाताने दाबुन पाहिले असता, त्यामध्ये झाडपाल्यासारखा कोणतातरी पदार्थ असल्याचे जाणवले. त्यानंतर त्या बँगेस बाहेरुन वास घेवुन पाहता, तो वास गांजा सारखा उग्र स्वरुपाचा आला. त्यामुळे त्या बैंगेमध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ असल्याचा संशय आला.

Advertisement

त्यानंतर त्यांचे ताब्यातील बॅगची झडती घेतली असता, बॅगमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने, इसम नामे १) निखिल यशवंत नवले वय २४ वर्षे, रा. रेल्वे स्टेशन विसापुर ता. श्रींगोदा जि. अहमदनगर २) आदित्य विलास देशमुख वय १९ वर्षे रा, हांडेबाई बौक, अनिकेत जाधव यांचे खोलीत विसापुर ता. श्रींगोदा जि. अहमदनगर यांचे विरुद्ध लोणीकंद पो.स्टे.गु.र.नं.८१/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन ०४ किलो २२६ ग्रॅम गांजा, गुन्हा करते वेळी वापरलेली मोटार सायकल व ०३ मोबाईल फोन असा एकुण १,२९.५२०/- रु.किं.चा. मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, (अतिरिक्त कार्यभार) व मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखा, श्री. उल्हास कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पो.स्टे.चे श्री. विश्वजीत काइंगडे, सहा. पो. निरी. सोमनाथ पडसळकर, तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन घाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे, सुहास तांबेकर, सागर जगताप, अमोल ढोणे यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!