घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याचे प्रकरण; माजी पत्रकारासह तिघांना पोलीस कोठडी
पंकेश जाधव संपादक 7020794626
सहकार नगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- भाडे कराराने घेतलेल्या जागेचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन घर नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लहुजी आर्मी नावाने संघटना चालवणाऱ्या एका माजी पत्रकाराने हा उपद्व्याप केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार मे 2022 ते 4 एप्रिल 2024 या कालावधीत धनकवडी मधील हत्ती चौकातील चाळ नंबर सी/6/14 येथे घडला आहे. आरोपींना न्यायालयात (Pune Court) हजर केले असता सर्व आरोपींना 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत तानाजी नामदेव पांगरे (वय-76 रा. चाळ नंबर सी/6/14, हत्ती चौक, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन अंबादास सूर्यवंशी , नरसिंह सुर्यवंशी (दोघे रा. मार्केट यार्ड रोड, आंबेडकर नगर), प्रभाकर इंगळे Prabhakar Ingle (रा. गोखलेनगर, लाल चाळ, पुणे) यांना अटक केली आहे. तर मुकेश जाधव (रा. आंबेडकर नगर) याच्यावर आयपीसी 420, 465, 467, 468, 471, 182, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील अंबादास हा माजी पत्रकार असून काही वर्षांपासून लहुजी आर्मी नावाने एक संघटना चालवीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

